सातारा

'कोयना जलविद्युत'ला बळकटी शक्‍य; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने नवीन प्रकल्पाला मिळणार गती!

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. त्या वेळी कोयना अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून नवीन प्रकल्पाची आखणी करावी, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे विजेच्या माहेरघरात येऊन प्रत्यक्ष केलेल्या चाचपणीमुळे कोयना प्रकल्प अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. 

पावसाळी अधिवेशनानंतर कोयना धरणाबाबत राज्य शासन काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. राज्य विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्यक्ष कोयना धरणाच्या भिंतीवर येऊन चाचपणी केली. कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करावी, अशा सूचना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. नवीन प्रकल्पांची आखणी करण्याचे आदेशही दिले आहेत. 

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चार टप्प्यांतून दोन हजार मेगावॉट वीजनिर्मिती होते. त्यातील एक हजार मेगावॉट क्षमतेचा चौथा टप्पा राज्याच्या उद्योगासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती फायद्याची आहे. कोयनेचे अजून सहा टप्पे प्रस्तावित आहेत. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रस्तावित आहे. त्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर विजेचे माहेरघर ही कोयनेची ओळख गडद होणार आहे. त्यामुळे त्यालाही चालना देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT