Jawali Sahakari Bank Sakal
सातारा

‘जावली बँके’साठी २३ जुलैला मतदान

बिगुल वाजला; निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

भिलार - जावळी तालुक्याची एकमेव अर्थवाहिनी असणाऱ्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. या बँकेची निवडणूक ता. २३ जुलैला होत आहे.

या निवडणुकीसाठी ता. २० जून ते २४ जूनदरम्यान ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. ता. २७ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, ता. २८ जून ते १२ जुलैदरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ता. १३ जुलैला चिन्हवाटप होईल व अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ता. २३ जुलैला मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थानी दिली आहे. जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीत १७ जागा निवडण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वसाधारण १२, महिला २, अनुसूचित जाती जमाती १, इतर मागास १, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग १ जागा अशी विभागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT