Fraud Case esakal
सातारा

'रामानंद'च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करा

भद्रेश भाटे

आर्थिक फसवणूकप्रकरणी रामानंद क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्याचे वाई न्यायालयाने आदेश दिले आहेत.

वाई (सातारा) : आर्थिक फसवणूकप्रकरणी रामानंद मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या (Ramananda Credit Society) अध्यक्ष, उपाध्यक्षांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे वाई न्यायालयाने (Wai Court) आदेश दिले. येथील सिद्धनाथवाडीतील सचिन लक्ष्मण पोळ या माजी सैनिकाने जानेवारी २०२० मध्ये रामानंद मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या वाई शाखेत ८ लाख ५० हजारांची रुपयांची ठेव अल्प मुदतीसाठी ठेवली होती. या ठेव पावतीची मुदत संपल्यावर ते रक्कम आणण्यासाठी संस्थेत गेले असता, त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली.

याबाबत वाई पोलिस ठाण्यात (Wai Police Station) तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कोविडचे कारण सांगून तक्रार घेतली नाही. सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शिंदे, उपाध्यक्ष भावेश मांडलिक व व्यवस्थापक मंगेश पिसाळ यांच्यासह नऊ जणांनी आकर्षक बक्षिसाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या आहेत. मात्र, मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत होते. वाई शाखा बंद असल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादी पोळ यांनी ठाणे येथील सोसायटीच्या मुख्य कार्यालयात जाऊन पैशाची मागणी केली.

तेव्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात ॲड. विकास पाटील- शिरगावकर यांनी पोळ यांची बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाई पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT