सातारा

'ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही, ख्यालीखुशालीसाठी केनियातून मला फोन आले'; वाई हत्याकांडातील ज्योतीचा उलटतपास सुरु

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा जिल्ह्यातील गाजलेल्या वाई हत्याकांड सुनावणीत माफीची साक्षीदार ज्योती मांढरेवर अनेक आरोप करण्यात आले. बुधवारी झालेल्या उलटतपासामध्ये ज्योतीने सर्व आरोप फेटाळत वस्तुस्थिती सांगितली. दरम्यान, या खटल्याची आज (ता. 25) पुन्हा सुनावणी होणार असून उलटतपास सुरूच राहणार आहे.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्यांना ऍड. मिलिंद ओक सहकार्य करत आहेत. या खटल्याची सध्या माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिचा उलटतपास सुरू आहे. संशयित आराेपी डाॅ. संताेष पाेळ यांच्या वतीने ऍड. श्रीकांत हुडगीकर हे काम पाहत आहेत. गेल्या चार सुनावण्यांपासून ज्योतीचा उलटतपास सुरू आहे. आजही पुन्हा उलट तपासाला सुरुवात झाली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात ज्योतीला थेट तिचे केनिया देशाशी संबंध असून ती ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. हे आरोप ज्योतीने खोडून काढले. 

कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवहार बंद

ज्योतीचे नातेवाईक केनियात असून ख्यालीखुशालीसाठी केनियामधून फोन आले असल्याचा दावा तिने केला. बचाव पक्षातर्फे ज्योतीवर आणखी दोन खुनाचे आरोप करण्यात आले. त्यावरही ज्योतीने न्यायालयात मुद्देसूद माहिती दिली. सध्या कोरोना संसर्गामुळे वाई हत्याकांड सुनावणीव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT