वाईत दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघड; दोघांना अटक, दोघे बालसुधारगृहात
वाईत दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघड; दोघांना अटक, दोघे बालसुधारगृहात  sakal media
सातारा

वाईत दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघड; दोघांना अटक, दोघे बालसुधारगृहात

भद्रेश भाटे

वाई : वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे दोन लाख किमतींच्या चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. संशयितापैकी दोन जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.

वर्षभरात पोलीस ठाण्यात १५ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने गस्त वाढवून शोध घेण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण विभागाला दिल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही दुचाकी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी नेमण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी शोध घेताना एक मुलगा दुचाकीवरून फिरताना दिसला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही दुचाकी रविवार पेठेतील अपार्टमेंटमधून चोरल्याचे सांगितले. त्याशिवाय आणखी एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याचवेळी जैन मंदिरापासून चोरीस गेलेली दुचाकी ही धर्मपुरी पेठेतील एकाने चोरल्याचे समजले. शोध घेऊन त्याच्याकडून ही दुचाकी ताब्यात घेतली.

पसरणीतील एकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. चिखलीतील एकाने ही गाडी दिल्याचे सांगितले. या चोरट्यासही ताब्यात घेण्यात आले. याबाबत वाई पोलीस ठाण्यात तीन, तर सातारा पोलीस ठाण्यात एका गुन्हयाची नोंद आहे. या प्रकरणी शाहरुख शरीफ बागवान (वय २८, रा. पागतलीमजवळ, धर्मपुरी, वाई) व विकास आनंदा दळवी (वय ३१, रा. चिखली, ता. वाई) या दोन संशयिताना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात पाठविण्यात येणार आहे.

पोलिस उपअधिक्षक डॉ. शीतल जान्हवे- खराडे, पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने, हवालदार अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT