Wai sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : वाईचा सर्वांगीण विकास करणार : मकरंद पाटील ; पर्यटनवाढीसाठी १५० कोटींचा आराखडा

Wai-Khandala Vidhan Sabha Election 2024 : वाईतील व्यापारी महासंघाच्या बैठकीत वाईचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : वाईच्या पर्यटनवाढीसाठी तब्बल १५० कोटींचा आराखडा तयार केला असून, वाई शहरामध्ये संपूर्ण देशातील पर्यटक यावेत, चित्रपटसृष्टी आकर्षित व्हावी, म्हणून वाईचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

वाई व्यापारी महासंघाच्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. या वेळी सुमन पाटील, अर्चना पाटील, कांतिलाल जैन, चंदुलाल गांधी, भारत खामकर, चरण गायकवाड, अनिल देव, सतीश शेंडे, नितीन कदम, सचिन फरांदे, दीपक ओसवाल, दीपक हजारे, विजय ढेकाणे आदी उपस्‍थित होते.

मकरंद पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाने लोकांचे प्रचंड नुकसान केले; पण त्या काळात अहोरात्र काम करून मी माझे कर्तव्य पार पाडले. आपला व्यापार, व्यवसाय वाढण्यासाठी पर्यटन वाढला पाहिजे. वाईच्‍या विकासासाठी सर्वांगीण विकास आराखडा केला आहे. व्‍यापाऱ्यांची अशी बैठक माझ्‍या राजकीय जीवनात पहिल्‍यांदाच होत असून, त्‍यांनी दाखविलेला विश्‍‍वास मी सार्थ ठरवेन.’’

या वेळी सतीश शेंडे, भारत खामकर, विशाल मोरे, मनीषा धैसास, सोनू ओसवाल, विजय ढेकाणे, चरण गायकवाड, नितीन कदम, सचिन फरांदे यांनी मनोगतातून वाईच्‍या विकासासाठीच्‍या अपेक्षा नोंदवल्‍या.

दीपक ओसवाल म्हणाले, ‘‘व्यापारी संघटनेच्या सर्व संस्था एकत्र आल्या असून, त्‍याचा केंद्रबिंदू मकरंद पाटील आहेत. गटतट, धर्म, पक्ष, जात आबांनी कधीच पाहिले नाहीत. कोरोना काळात त्यांनी तिन्ही तालुक्यांतील नागरिकांना बळ दिले. उभे राहण्यासाठी ताकद दिली.’’

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT