sakal logo sakal logo
सातारा

'अधिकारी थेट पैसे मागण्याचे धाडस करतो जेव्हा त्याला राजकीय वरदहस्त असतो'

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व माहिती घेऊन पूर्ण चौकशीअंती योग्य ती कारवाई करू, असे सभापती संगीता चव्हाण यांनी आश्वासन दिले

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : सत्ताधारी गटाच्या गांधारीपणाच्या भूमिकेमुळे आणि राजकीय वरदहस्तामुळे पंचायत समितीत भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप सदस्य दीपक ननावरे व ऋतुजा शिंदे यांनी केला. पंचायत समितीची मासिक सभा सभापती संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली किसन वीर सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी विषय पत्रिकेतील विषयांवर चर्चा झाल्यानंतर सदस्य दीपक ननावरे व ऋतुजा शिंदे यांनी गटविकास अधिकारी हे विविध विकासकामांचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून थेट पैसे मागत असल्याची माहिती सभागृहाला दिली.

अधिकाऱ्यांच्या हप्ता वसुली, ठेकेदार वसुली आणि एकूणच भ्रष्टाचाराचा पाढाच ननावरे यांनी सभागृहासमोर मांडला. बावधन गणातील एक ग्रामस्थ आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी एका धनादेशावर सही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट पैसे मागितलयाचे सांगितले. एका ठेकेदाराने फोनवर संपर्क साधून आम्ही तुम्हाला भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी मते दिली होती का? असा प्रश्‍न केल्यावर आम्ही निरुत्तर झालो. पंचायत समितीत खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी आजवर कानावर येत होत्या; पण तो इतका फोफावला असेल अस वाटत नव्हते. अधिकारी थेट पैसे मागण्याचे धाडस तेव्हाच करतो जेव्हा त्याला राजकीय वरदहस्त असतो.

वाई पंचायत समितीत जे काही सुरू आहे त्याला सर्व सत्ताधारी गट जबाबदार आहे. सत्ताधारी गट आणि अधिकारी यांच्या मिलीभगतमधूनच हा भ्रष्टाचार सुरू असल्याचा घणाघात ननावरे यांनी केला. पदाधिकाऱ्यांचे हात काळे झाल्याशिवाय अधिकाऱ्यांची मुजोरी वाढू शकत नाही, असा आरोप करून ननावरे यांनी अधिकारी अन्‌ पदाधिकारी यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ऋतुजा शिंदे यांनी पंचायत समितीमधील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व माहिती घेऊन पूर्ण चौकशीअंती योग्य ती कारवाई करू, असे सभापती संगीता चव्हाण यांनी आश्वासन दिले. या वेळी उपसभापती विक्रांत डोंगरे वगळता सर्व सदस्य सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

याला म्हणतात माणुसकी! गावागावांत गुंठाभर जमिनीसाठी होतात वाद, इथं चव्हाण कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रासाठी दिली जमिन दान

याबाबत उपसभापती डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता. एका महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी होतो. त्यामुळे या मासिक सभेस अनुपस्थित होतो. दीपक ननावरे, ऋतुजा शिंदे या सन्माननीय सदस्यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. वाई पंचायत समितीचा राज्यात मोठा नावलौकिक आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामस्थ हिताची कामे करण्यावर आजवर भर दिला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असा ठाम विश्वास त्यांनी दिला.

""वाई पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य दीपक ननावरे व ऋतुजा शिंदे यांनी सभागृहात कोणाचेही नाव न घेता अधिकाऱ्यांवर भ्रष्ठाचाराचे आरोप केले. वास्तविक पाहता मार्चअखेरची सर्व बिले अदा केली असून, अशा प्रकारची कोणतीही मागणी केल्याची लेखी तक्रार आली नाही. तशी कोणी तक्रार केली असल्यास त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू.''

- उदयकुमार कुसुरकर, गटविकास अधिकारी, वाई पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT