सातारा

महिलेचे अश्‍लील छायाचित्र प्रसारित करणाऱ्यास अटक; वडलेतील तरुणाकडून मैत्रीचा गैरफायदा

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : एका 35 वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तिचे अश्‍लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी सागर तुकाराम सोनवलकर (वय 28, रा. वडले, ता. फलटण) याला वाई पोलिसांनी अटक केली. 

संबंधित पीडित महिला वाई तालुक्‍यात कुटुंबीयांसह राहते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तिने फेसबुकवर अकाउंट उघडले. त्यावर आलेल्या विनंतीवरून या महिलेची सागरशी मैत्री झाली. त्यातून दोघांमध्ये फेसबुक व व्हॉटसऍपवर संभाषण (चॅंटिंग) सुरू झाले. सोनवलकरने या महिलेचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर सोनवलकरने व्हिडिओ कॉल करण्यास सांगून त्याचे फोटो काढले. अश्‍लील फोटोची मागणी केली. त्याच्याकडून वारंवार अशी मागणी वाढू लागल्याने महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

त्यावर सोनवलकरने मुलींची लग्न होऊ देणार नाही, तसेच अश्‍लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्याचा राग मनात धरून सोनवलकरने महिलेच्या अकाउंटवरील अश्‍लील छायाचित्र पीडितेच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर व समाज माध्यमावर पाठवली. या त्रासाला कंटाळून महिलेने वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोनवलकरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT