सातारा

पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील तिघांवर वाईत गुन्हा दाखल

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : बलात्काराच्या केसमधून सुटायचे असेल तर ५० कोटी रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मनीष हरिष मिलानी यांना खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तिघांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाचे नाव सागर सूर्यवंशी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील मनीष मिलानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलांनी सागर सूर्यवंशी यास कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले होते. त्याचा चालक अश्फाक मेहबूब खान हा आहे. सुर्यवंशी याने वडिलांच्या नावाची जमीन परस्पर त्याच्या पत्नीच्या नावाने केल्याची बाब एप्रिल २०१४ मध्ये निदर्शनास आली. त्याने  २०१५ मध्ये बनावट स्टँप वापरून ती जमीन सय्यद हुसेनी याच्या नावाने केल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

सातारकरांनाे.. 'या' स्पर्धेत सहभागी व्हा अन् भरघाेस बक्षीस मिळवा 

त्यावरून चिडून जाऊन सागर याने पालघर, भिवंडी, पुणे, वाई, कोरेगाव या पोलीस ठाण्यात त्रयस्थ व्यक्तिमार्फत खोट्या तक्रारी केल्या आहेत. वाई पोलीस ठाण्यात १८ जानेवारी २०२० रोजी दाखल असलेल्या ३७६, ३२३,५०४, ५०६,३४ या गुन्ह्याच्या कामी मनीष हे वाई येथे ऑगस्ट २०२० मध्ये आले होते. पोलीस चौकशी झाल्यानंतर ते शिवाजी चौकात एका ठिकाणी चहा घेत असताना अशरफ व एक महिला जवळ आली. त्यांनी सागर भाई फोनवर आहेत म्हणून फोन दिला. तुला जर रेपच्या केस मधून सुटायचे असेल तर ५० कोटी रुपये दे किंवा तुझ्या वडिलांच्या नावाची जमीन आमच्या नावावर करून दे, सागर भाईच्या नादाला लागु नको. जिवंत सोडणार नाही म्हणून धमकी दिली. 

सेंट झेविअर्स सुरुच हाेती ? शिक्षण विभागाच्या अहवाल गुलदस्त्यात

त्यावरून वाई पोलिस ठाण्यात खंडणीची मागणी करणाऱ्या सागर सूर्यवंशी, अशरफ खान व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शिर्के तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT