Crime News esakal
सातारा

भित्तिशिल्प उद्‌घाटनप्रकरणी साताऱ्यात ३० जणांवर गुन्हा

राजवाडा बस स्थानकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचे भित्तिशिल्प उभारण्यात आले आहे.

प्रवीण जाधव

सातारा : उद्‌घाटनास मनाई असताना राजवाडा बस स्थानकावरील भित्तिशिल्पावरील ताडपत्री काढून नुकसान करून शांतता भंग केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे व नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह सुमारे ३० जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Case File) झाला आहे. राजवाडा बस स्थानकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji maharaj) व समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचे भित्तिशिल्प उभारण्यात आले आहे. त्यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. असे असतानाही काल (ता. २०) सायंकाळी नगरसेवक विजय काटवटे, प्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या भित्तिशिल्पाचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद रमाकांत एकबोटे (रा. शिवाजीनगर, पुणे), भाजप नगरसेवक विजय अजित काटवटे (रा. रामाचा गोट, सातारा), शहाजीबुवा रामदासी (रा. सज्जनगड, ता. सातारा), संकेत विजयकुमार शिंदे (रा. पिलेश्वरीनगर करंजे, सातारा), सूरज सोमनाथ भगत (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यासह अनोळखी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार जगदाळे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाला १४ वर्ष झाली, पण पाळणा हलला नाही; पत्नीला राग अनावर, संतापात पतीच्या गुप्तांगावर उकळतं पाणी ओतलं अन्...

ही कुठली भक्ती आहे? स्वामी कधी वागलेही नसतील असे विचित्र हातवारे करून... महेश टिळेकरांनी सुनावलं

लोकसभा खासदारांच्या तुलनेत राज्यसभेचे खासदार अडीच पट श्रीमंत; कोणाकडे सर्वाधिक संपत्ती? नवीन यादी जाहीर

Beed Corruption: माजलगाव सहाय्यक निबंधक कार्यालयात एसीबीची धाड; सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडले, सावकारकी परवाना अन्..

Pune Rescue: पुण्यात थरारक रेस्क्यू! दोन महाकाय पाइपमध्ये अडकलेल्या रानगव्याला अखेर जीवनदान; मूक प्राण्यासाठी ‘देवदूत’सिंहगड रस्ता धावले

SCROLL FOR NEXT