ashadhi wari varkari road accident
ashadhi wari varkari road accident sakal
सातारा

वडियेरायबागच्या वारकऱ्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भुईंज - वडियेरायबाग (ता. कडेगाव, जि. सांगली) येथून आळंदी येथे ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या ट्रकला महामार्गावरील रायगाव फाटा (ता. जावळी) गावच्या हद्दीत अपघात झाला. त्यात एक वारकरी जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. भीमराव कोंडिबा जगताप (वय ८०, रा. वडियेरायबाग) असे मृताचे नाव आहे, तर अशोक मोहिते (वय ५५), नंदकुमार महाराज पवार (वय ७७), माउली माने (वय ९०) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

कडेगाव तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कडेगाव तालुक्यातील अनेक गावांतील वारकरी हे आळंदी येथे ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्‍यासाठी निघाले असताना गौरीशंकर कॉलेज ते रायगाव फाटादरम्यान ट्रकचा टायर फुटल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकची (क्र. एमएच ४६ बीबी २२४१) जोरदार धडक बसली. अचानक झालेल्या अपघातामुळे ट्रकच्या पाठीमागे बसलेले भीमराव पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अशोक मोहिते, नंदकुमार महाराज पवार व माउली माने हे जखमी झाले असून त्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वाईच्या पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामार्ग पोलिस, भुईंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT