MLA Shivendrasinhraje Bhosale
MLA Shivendrasinhraje Bhosale  esakal
सातारा

‘मजिप्रा’च्या थकीत बिलाचा विलंब आकार माफ; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

गिरीश चव्हाण

जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांनी पाणीबिल थकविल्याने त्यांच्या बिलावर विलंब आकार, दंडव्याज लावण्यात आले होते.

सातारा - जीवन प्राधिकरणाच्या (Jeevan Pradhikaran) ग्राहकांनी पाणीबिल (Water Bill) थकविल्याने त्यांच्या बिलावर विलंब आकार, दंडव्याज लावण्यात आले होते. दरम्यान, अन्यायकारक विलंब आकार माफ करण्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. यानुसार मंत्री पाटील यांनी विलंब आकार माफ करण्याचा निर्णय घेत ग्राहकांना दिलासा दिल्‍याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्‍या वतीने पत्रकाद्वारे देण्‍यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउन, महागाई आणि काम- धंदा बंद असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या असंख्य ग्राहकांना वेळेत पाणीबिल भरण्यास शक्य झाले नाही. त्यातच प्राधिकरणाने थकीत बिलावर विलंब आकार लावल्याने ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली होती.

याबाबत सातारा शहर आणि परिसरातील ग्राहकांनी भेट घेत विलंब आकार माफ करण्‍याची मागणी केली होती. त्यानुसार या विषयाचा पाठपुरावा करत गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन दिले होते. या मागणीचा विचार करत मंत्री पाटील यांनी साताऱ्यासह संपूर्ण राज्‍यासाठी अभय योजना लागू करून विलंब आकार, दंडव्याज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा सदरबझार, शाहूनगर, विसावा नाका, गोडोली, शाहूपुरी, खिंडवाडी, खेड, पिरवाडी आदी भागांतील, तसेच पाचगणी आणि महाबळेश्वर येथील ग्राहकांनाही होणार असल्‍याचेही शिवेंद्रसिंहराजे यांच्‍या वतीने देण्‍यात आलेल्‍या पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT