सातारा

नाटोशीसह सहा गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार; प्रशासनाला प्रस्ताव सादर

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : नाटोशी येथे नव्याने उपसासिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे नाटोशी, कुसरूंड, शिंदेवाडी, सोनवडे, सुळेवाडी, मरळी या सहा गावांतील वाढीव 377 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. वाढीव उपसासिंचन योजनेसह संपूर्ण प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केल्याची माहिती मोरणा-गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता सागर खरात यांनी दिली. 

मोरणा-गुरेघर धरणाचा मोरणा उजवा कालवा एकूण 32 किलोमीटर लांबीचा असून कालव्याचा काही भाग आब्रंग, वाडीकोतवडे, नाटोशी या तीन गावांच्या हद्दीतून जाणार आहे. बंदिस्त पाइपलाइनव्दारे सिंचन प्रस्तावित करण्यात आला आहे. या बंदिस्त पाइपलाइन नाटोशी, कुसरूंड. शिंदेवाडी, सोनवडे, सुळेवाडी, मरळी, गव्हाणवाडी ते साजूर या गावाच्या हद्दीतून जात असल्याने शेतकऱ्यांचा शेतीला शाश्वत पाणी मिळणार आहे. नाटोशी ते साजूरपर्यंतच्या कालव्याचे काम बंदिस्त पाइपलाइनने होईल. 

उजव्या कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 2,995 हेक्‍टर आहे. धरणाच्या डावा कालवा हा धरण स्थळापासून 17 किलोमीटर लांबीचा असून हा कालवा धावडे, कोकिसरे, मोरगिरी, किल्ले मोरगिरी, चेवलेवाडी, नेरळे, माणगाव, आडदेव, आंब्रळे, बेलवडे खुर्द, चोपडी या 11 गावांच्या हद्दीतून जाणार आहे. डावा कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 811 हेक्‍टर आहे. प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र 3,806 हेक्‍टर आहे. कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

कालव्याचे पाणी झिरपून नुकसान 
खोदकाम केलेल्या कालव्याशेजारील जमीन कालव्यामध्ये पाणी साचून पाण्याने झिरपून पिकांची नासाडी होत आहे. त्याची नुकसानभरपाई आणि भूभाडेबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्या तरी नाटोशी येथे नव्याने उपसासिंचन योजना प्रस्तावित केली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सहा गावांतील वाढीव 377 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT