Satara Dam 
सातारा

Koyna Dam : धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणांनी गाठला तळ; कोयना धरणात किती आहे पाणीसाठा?

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्यावर्षी पावसाचे (Monsoon) प्रमाण कमी राहिल्यामुळे सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वच तालुक्यांत पाणी टंचाई आहे.

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात (Tarli Dam) गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी पावसाचे (Monsoon) प्रमाण कमी राहिल्यामुळे सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वच तालुक्यांत पाणी टंचाई आहे. त्यातच प्रमुख धरणांमध्ये अल्प पाणी शिल्लक आहे. गतवर्षी कोयना (Koyna Dam), धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी कमी पावसामुळे प्रमुख धरणे पूर्ण भरलेली नाहीत.

यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतील पाणीपातळी खूपच कमी आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यासह सातारा तालुक्यासाठी उरमोडी धरण महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सर्वात भीषण स्थिती उरमोडी धरणातील झाली आहे. या धरणात केवळ ०.४३ टीएमसी पाणी आहे. एकूण क्षमतेच्या अवघे साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून ३९.४२ टीएमसी पाणी शिल्लक होते. आता धोम- बलकवडी धरण कोरडे पडले आहे. तारळी धरणातही पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणात २४.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना व कण्हेर धरणात पाणीसाठ्याची परिस्थिती बरी असून, कोयनेत १३.२४ टक्के तर कण्हेर १२.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रमुख धरणांतील तुलनात्मक आकडेवारी (टीएमसी)

धरण २०२३ २०२४ धरण २०२३ २०२४

  • कोयना १३.४७ १३.२५

  • धोम ३.२९ २.९०

  • बलकवडी ०.७२ ०.००

  • कण्हेर १.८५ १.२१

  • उरमोडी ३.८४ ०.४३

  • तारळी ३.१७ १.४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT