Wathar Village Sakal
सातारा

Alcohol : वाठारला बाटली राहणार आडवीच; गावात वाईन शॉप, बीअर बारला विरोध

वाठार (जि. सातारा) येथे काल बुधवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत देशी- विदेशी दारू, वाईन शॉप, बियर बारला विरोध दर्शवण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

वाठार (जि. सातारा) येथे काल बुधवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत देशी- विदेशी दारू, वाईन शॉप, बियर बारला विरोध दर्शवण्यात आला.

कऱ्हाड - वाठार (जि. सातारा) येथे काल बुधवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत देशी- विदेशी दारू, वाईन शॉप, बियर बारला विरोध दर्शवण्यात आला. आज गुरुवारी झालेल्या पुरुषांच्या ग्रामसभेतही सर्व उपस्थितांनी एकमुखाने हातवर करून त्याला विरोध केला. त्यामुळे आता वाठार येथे बाटली आडवीच राहणार आहे.

गावात देशी- विदेशी दारू दुकान (वाईन शॉप) आणि बिअर बारला परवानगी देण्यावर चर्चा करण्यासाठी वाठार ग्रामपंचायतीने महिला व पुरूषांची स्वतंत्र ग्रामसभा आयोजित केली होती. सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे, रंजना माने, स्वप्निल कानडे, अभिजीत पाटील, ग्रामसेवक रियाज मोमीन, लिपीक अनिकेत माने यांच्यासह पुरुष, महिला उपस्थित होत्या. ग्रामसेवक मोमीन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.

वाठार येथील एकाने स्वः मालकीच्या जागेत बिअर बार व दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकत दाखल मिळावा, असा अर्ज ग्रामपंचायतीकडे केला होता. त्याला दाखला द्यायचा की नाही यासाठी तेथे काल महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. त्यात कालच्या सभेला 180 महिला उपस्थित होत्या. तर आज 140 पुरूष उपस्थित होते. त्यापैकी 75 पुरूषांनी बार, दारू दुकान व्हावे या ठरावाच्या विरोधात हात वर केला. तर 22 पुरूषांनी ठरावच्या बाजूने मतदान केले. तर उर्वरीत 43 जणांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे आता वाठार गावात यापुढे बार, देशी- विदेशी दारू किंवा वाईन शॉप होवू नये यावर ग्रामस्थांचे बहुमत झाले आहे. परिणामी गावात आता दारुची बाटली आडवीच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT