विमानतळाच्या अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करू : बाळासाहेब पाटील sakal
सातारा

विमानतळाच्या अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करू : बाळासाहेब पाटील

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड ः विमानतळाच्या अटीबाबत अधिक माहिती घेवून त्याचा कऱ्हाड विकासावर परिणाम होणार याची काळजी घेवू अशी ग्वाही सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. विमानतळामुळे वीस किलोमीटरच्या अटीचा कऱ्हाडच्या विकासावर परिणाम होत असल्याने क्रीडाई संस्थेचे पदाधिकऱ्यांनी आज पालकमंत्री पाटील यांची भेट गेवून निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अश्वासन दिले.

विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी ती अट शिथील करण्यासाठी पाकमंत्री पाटील यांनी प्रयत्न करावेत, यासाठी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना साकडे घातले. क्रीडाईचे अध्यक्ष महेश पाटील, सतीश यादव, धनंजय कदम, नितीन काटू यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. क्राडीईतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाडच्या विकासालाही विमानतळाची अटक मारक आहे. त्यामुळे होणारे नुकसान भरून न येणारे आहे.

विमानतळाचे निकषाचा फेरविचार करून विमानतळाची असणारी अडथळ्यांच्या पृष्ठभागाची फेरतपासणी व्हावी. यावेळी क्रेडाईच्या सदस्यांनी मंत्री पाटील यांना किलो मीटर परिघाचे अंतर भूमितीय मोजणीने साधारण तीन किमी होते. त्यामुळे ते नेमके २० की तीन किलोमीटर आहे, याची माहिती घेवून बांधकाम मर्यादेबाबत निर्णय व्हावा, अशी विनंती केली. यावेळी मंत्री पाटील यांनी त्याबाबत सविस्तर चर्चा केली. विमानतळ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे अश्वासनही दिले. कऱ्हाडच्या विकासाला मारक असा आदेश लागू होवू देणार नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT