weather update rain forcast rain in mahabaleshwar but pachgani did not get water water supply department satara sakal
सातारा

महाबळेश्वरला पावसानं झोडपलं; पांचगणीत मात्र पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, जाणून घ्या नेमकं प्रकरण?

शहराला दिवसाला २७ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते , मात्र येथील उपसकेंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून गळती असल्याने दिवसाला अंदाजे एक लाख लिटर पाणी जमिनीत मुरत असल्याची माहिती आहे

सुनील कांबळे

पांचगणी : सततच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे वेण्णा धरण भरले आहे, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे , वळचणीचे पाणी धो धो पडत आहे ... अशी परिस्थिती असताना 'आडात आहे मात्र पोवऱ्यात येत नाही' , पाणी पुरवठा केंद्राच्या गलथानपणा मुळे गेल्या तीन दिवसापासून पावसाचे आगार असलेल्या याठिकणाच्या नागरिकांचे पाण्याविना हाल होत असून पावसाच्या धारा अंगावर घेत सर्वांना पाणी मिळेल का पाणी 0 पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. शहराला दिवसाला २७ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते , मात्र येथील उपसकेंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून गळती असल्याने दिवसाला अंदाजे एक लाख लिटर पाणी जमिनीत मुरत असल्याची माहिती आहे .

शहरातील एकूण २७०० ग्राहकांना चार साठवण टाक्यातून पाणीपुरवठा केला जातो त्यापैकी पाणीपुरवठा उपसकेंद्राच्या ठिकाणी पंप ठेवण्यात आले आहेत मात्र गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे त्याठिकाणी पाणबुड्या पंप बसविण्यात आला आहे तो ही चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या पद्धतीने त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीउपसा होत नाही व परिणामी शहराला पाणीपुरवठा होत नाही . सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार पांचगणीकरांच्या पाचवीलाच पुजले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत .अधिक माहिती उपलब्ध आहे झाली आहे ती अशी की सध्या जी परिस्थिती उदभवली आहे ती जीवन प्राधिकरण मंडळाच्या ,दुर्लक्षते व गलथानपणा मुळे व झळा मात्र नागरिकांना सोसाव्या लागत आहेत .

दरम्यान फेब्रुवारी मध्ये सकाळने पम्पिंगसेटला पांचगणीत घरघर ही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासातच या बातमीचा इम्पॅक्ट होऊन वरिष्ठांनी बातमीत प्रसिद्ध झालेल्या बाबींचे गंभिर्याची दखल घेत तातडीने अभियांत्रिकी अभियंता व ५० हॉर्सपॉवरचा सबमर्ससेंबल पंप बसवला होता व या तो स्टँडबाय म्हणून काम करणार असून यापुढे यंत्रणा खंडित होणार नसल्याची माहिती दिली होती मात्र त्याची पाणी उपसण्याची क्षमता थंडावली असून दुसरा नादुरुस्त झालेला पंप उपसकेंद्रा कडे आपल्या कोणी घेऊन जाणार या प्रतीक्षेत बसला आहे . निवासी शाळा व पर्यटकांवर अवलंबून असलेली येथील आर्थिक घडी कोरोनामुळे विस्कटली होती , बंद असलेल्या निवासी शाळा कोठे पूर्णपथावर येत असताना पांचगणीकर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी मात्र भटकंती करत असणे म्हणजे शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT