weather update rain in mayni satara district damage of various crops farmer Demand for government assistance sakal
सातारा

मायणीत वादळी वाऱ्यामुळे लाखोंचे नुकसान, सरकारी मदतीची मागणी

एका केळीच्या बागेतील ८७ झाडेही जमीनदोस्त झाली

संजय जगताप

मायणी : येथे जोरदार वादळी वाऱ्यासह काल रविवारी (ता.पाच ) झालेल्या पावसामुळे बायाक्का सर्जेराव देशमुख यांच्या मालकीची द्राक्ष बाग जमीनदोस्त होऊन सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वादळी वारे व पावसाने घरांचे पुढचं होऊन पडझड होऊन सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एका केळीच्या बागेतील ८७ झाडेही जमीनदोस्त झाली आहेत. तर चार ठिकाणी पत्र्याची शेड वादळी वाऱ्याने उडून जाऊन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे.

आज येथील गाव कामगार तलाठी गौरव खटावकर व पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार, शिंदेवाडा रोड लगत मायणी तलाव परिसरातील बायाक्का सर्जेराव देशमुख यांच्या मालकीची गट नं. २२८ मधील ०.६० हेक्टर आर क्षेत्रावरील द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे सुमारे अकराशे झाडे जमिनीवर कोसळली आहेत. त्या मांडवाची पुन:उभारणी करण्यासाठी किमान पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे देशमुख यांनी सकाळला सांगितले. दरम्यान, येथील इंदिरानगर भागातील संगिता नामदेव तुपे यांच्या राहत्या घरावरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. त्याच भागातील दत्ता शंकर मोरे यांच्या मालकीच्या शेडचे पत्रे उडाले आहेत.

महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे येईल श्रीखंडे वस्ती परिसरातील दत्तात्रय सोपान कचरे यांनी जनावरासाठी उभे केलेल्या शेडचे पत्रे उडून गेलेत. संग्राम माने यांचे गट नं.२११० मधील जनावरांसाठी उभे केलेल्या शेडचे पत्रे उडून गेले आहेत. तर त्याच भागात राहणाऱ्या हसन चाँद बागवान यांचे मालकीचे गट नं. २१०६ मधील केळीची ८७ झाडे जमीनदोस्त झाली. आहेत. दरम्यान, घरावरील पत्रे व जनावरांच्या शेड वरील पत्रे उडून गेल्याने नुकसानग्रस्त कुटुंबीय अडचणीत आले आहे. त्यांना तातडीने सरकारी मदतीची मागणी होत आहे. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे काल सायंकाळी पाचच्या दरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा रात्रभर आणि आज दिवसभरही सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT