marrage 
सातारा

झाडाखाली उडवला लग्नाचा बार!

सकाळ वृत्तसेवा

विंग (जि. सातारा) ः मोजक्‍याच नातेवाइकांच्या साक्षीने कार्यालयात लग्न करण्याचा आखलेला बेत कोरोनामुळे फसल्याने मित्रांच्या मदतीने येथे झाडाखाली लग्नाचा बार उडवून दिल्याची घटना घडली. येवती (ता. कऱ्हाड) येथील आरोग्यसेवक कोविड योद्धा युवराज लक्ष्मण शेवाळे अणि गुढे (ता. पाटण) येथील मोनिका तुकाराम पाटील यांनी झाडाखालीच सात फेरे घेतले. लगीनगाठ बांधून निसर्गाच्या सान्निध्यात सहजीवनाची शपथ घेतली. 

कोरोनाच्या गर्तेत अनेक लग्नसोहळे सापडले आहेत. शासनाने पर्यायी मार्ग काढत 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, कार्यालयीन परवाने काढणे, नियमांचे पालन करणे जिकिरीचे बनले आहे. लगीन ठरलेल्या उपवर वधूसह कुटुंबीय त्यामुळे चिंतेत आहेत. अनेकांची मुहूर्तवेळ निघून गेली आहे. पर्यायी मार्गाने क्वचितच विवाह घडत आहेत. येवती येथील आरोग्यसेवक शेवाळे तर गुढे येथील मोनिका यांचा विवाह काल पर्यायी मार्गाने झाला. तत्पूर्वी एका कार्यालयात लग्नाचा बेत त्याचा फसला. तो अचानक रद्द करावा लागला. त्यानंतर मात्र लग्नसाठी मोठी कसरत घ्यावी लागली. त्यांच्या मदतीला मित्रच धावून आले. उपवर-वधूला चक्क झाडाखाली लग्नाचे विधी पार पडले. तेही मोजक्‍याच वऱ्हाडींच्या साक्षीने. नव दांपत्याला थोरांनी आशीर्वाद दिले, तर मित्र- मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. 

श्री. शेवाळे कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक आहेत. तर गुढे येथील आरोग्य विस्तार अधिकारी तुकाराम पाटील यांची कन्या मोनिका या स्पर्धा परीक्षेच्या क्‍लासेस घेतात. थाटामाटात लग्नाचा बेत आखून कऱ्हाड येथे कार्यालयाचेही बुकिंग केले होते. मात्र, कोरोनामुळे त्यात व्यत्यय आल्याने अखेर मोजक्‍या वऱ्हाडींच्या साक्षीने विवाह पार पडला पण तासे झाडाखाली. या अनोख्या विवाहाची चर्चेचा विषय बनला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT