Satara Municipality esakal
सातारा

सातारा : घंटागाडीचे ६ कोटींचे टेंडर कुणाला?

साताऱ्यात आज प्रक्रिया पूर्ण होणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलन करण्‍यासाठी सातारा नगरपालिकेमार्फत खासगी ठेकेदार नेमण्‍यात आला होता. या ठेकेदाराचा कार्य कालावधी संपुष्‍टात आल्‍याने ठेकेदार नियुक्‍तीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असू्न त्‍याबाबतची अंतिम कार्यवाही उद्या (ता. १) सातारा पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍या उपस्‍थितीत पार पाडण्‍यात येणार आहे. कचरा संकलन करण्‍यासाठीचे हे सहा कोटींचे टेंडर कुणाला मिळणार, याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलनाचे काम पालिकेच्‍या वतीने ‘भाग्‍यदीप’ या संस्‍थेस देण्‍यात आले होते. काम दिल्‍यानंतर त्‍या ठेकेदाराकडे पालिकेच्‍या ४० घंटागाड्या सोपविण्‍यात आल्‍या होत्‍या. या घंटागाड्यांच्‍या मदतीने शहराच्‍या विविध भागातील कचरा संकलन करत तो सोनगाव कचरा डेपोत प्रक्रियेसाठी पोचविण्‍याची जबाबदारी त्‍या ठेकेदारास देण्‍यात आली होती. या ठेक्‍याची मुदत संपल्‍यानंतर पालिकेने त्‍या कामासाठीची फेर निविदा काढण्‍याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी दर मंजुरीचा विषय हा जीवन प्राधिकरणाच्‍या मार्गदर्शन सूचनांनुसार पूर्ण करण्‍यात येणार होता. मात्र, त्‍यासाठी बराच कालावधी लागला. दर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ती फाईल जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्‍याकडे पालिका प्रशासनाने सादर केली. या फाईलला मंजुरी दिल्‍यानंतर पालिकेने त्‍यासाठीची प्रक्रिया सुरू केली.

त्यानुसार जाहीर झालेल्‍या निविदा प्रक्रियेवरील अंतिम कार्यवाही उद्या सातारा पालिकेत होणार आहे. सुमारे सहा कोटी रुपयांचे हे टेंडर कोणत्‍या कंपनीस मिळणार, याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेने स्‍वत:च्‍या ४० घंटागाड्या सध्‍या कार्यरत असणाऱ्या ठेकेदारास वापरासाठी दिल्‍या होत्‍या. या घंटागाड्या पुन्‍हा एकदा पालिका ताब्‍यात घेणार आहे. या गाड्या ताब्‍यात घेण्‍यापूर्वी त्‍या घंटागाड्यांची तांत्रिक तपासणी करून त्‍याचे प्रमाणपत्र सादर करण्‍याचे आदेशही पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारास दिले आहेत.

स्वच्छतागृह स्‍वच्‍छतेसाठी ४ कोटी

कचरा संकलनासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर पालिकेच्‍या वतीने जाहीर करण्‍यात आले होते. ही प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात असून त्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्‍वच्‍छता व इतर कामांसाठीचे ४ कोटींची टेंडर काढण्‍याची प्रक्रिया पालिकास्‍तरावर पार पाडण्‍यात येणार आहे. या टेंडरच्‍यावेळी देखील मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणीस पुन्‍हा एकदा वेग येण्‍याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT