विमानतळाच्या अटीमुळे विकासाला बाधा न येण्यासाठी प्रयत्न करणार : चव्हाण sakal
सातारा

विमानतळाच्या अटीमुळे विकासाला बाधा न येण्यासाठी प्रयत्न करणार : चव्हाण

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड ः कऱ्हाडच्या विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघातील क्षेत्रात बांधकाम उभारणीसाठी निर्बंध लावल्याने त्याचा कऱ्हाडच्या विकासासह बांधकाम व्यवसायासह परिणाम होतो आहे. त्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नाही, मात्र तरिही अटीमुळे कऱ्हाडच्या विकासात कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करू, असे अश्वासन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

विमानतळामुले वीस किलोमीटच्या अटीचा कऱ्हाडच्या विकासावर परिणाम होत असल्याची गोष्ट लक्षात घेवून पालिका, क्रीडाई संस्थेचे पदाधिकऱ्यांनी ती अट शिथील करण्यासाठी आमदार चव्हाण यांची भेट घेवून बैठक घेतली. पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपाध्यक्ष जयवंत पाटील, नगरसवेक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, महेश कांबळे यांच्यासह क्रीडाईचे अध्यक्ष महेश पाटील, सतीश यादव, नितीन काटू यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. यावेळी क्राडीईतर्फे निवेदनही देण्यात आले.

त्यात म्हटले आहे की, बांधकाम व्यवसायसह कऱ्हाडच्या विकासालाही ती अट मारक आहे. सामान्य नागरीकांच न भरून येणारे नुकसान त्या अटीमुळे होणार आहे. बांधकाम व्यवसायाच्या अनुशंगाने व्यवसाय ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. विमानतळाचे निकषाचा फेरविचार करून विमानतळाची असणारी अडथळ्यांच्या पृष्ठभागाची (ऑबस्टॅगल लिमीटेशन सरफेस) फेरतपासणी व्हावी. ती शहर व परिसाच्या विकासाच्या दृष्टीने असावी. क्रीडाई संस्थेने दिलेले निवेदन व त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आमदार चव्हाण यांनी सकारात्मकता दाखवली.

विमानतळ प्राधीकरणाचे दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी श्री. बन्सल यांच्याशी आमदार चव्हाण यांनी बैठकीतूनच चर्चा केली. त्यावेळी विमानतळाच्या त्या आदेशाबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याची बाब समोर आली. आमदार चव्हाण म्हणाले, विमानतल प्राधीकरमाकडेही त्याबाबत सविस्तर माहिती नाही. त्या आदेशाची अदिक स्पष्टता यावी, यासाठी अन्य वरिष्ठांशी बोलून त्याचा निर्णय घेवू. ती अटक केवळ कऱ्हा़डसाठी आहे की, राज्य, देशातही ती अट लागू आहे. याची माहिती गेवून त्यावर उपायांसाटी सर्वतोपरी प्रयत्न करून. क्रीडाई व पालिकेनेही त्याबाबत संयुक्त प्रयत्न करून त्याबाबतची माहिती घ्यावी. त्याबाबत उपाय सुचवावेत, तीही माहिती सरकारी यंत्रणेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT