Khambatki Ghat Accident esakal
सातारा

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात भीषण अपघात; कंटेनरच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार

आज सायंकाळी कंटेनर जात असताना विरुद्ध बाजूने दुचाकी वाहन घेऊन दोघे निघाले होते.

अशपाक पटेल

दरम्यान, घटनास्थळी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटाच्या (Khambatki Ghat) सहाव्या वळणावर भैरवनाथ मंदिराजवळ कंटेनरला धडकून मागच्या चाकाखाली आलेल्या सुलतानपूर (ता. वाई) येथील नंदिनी राजेंद्र कळंगुडे या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की आज सायंकाळी कंटेनर जात असताना विरुद्ध बाजूने दुचाकी वाहन घेऊन दोघे निघाले होते. यावेळी गाडी मागे बसलेली महिला नंदिनी यांचा तोल जाऊन, त्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्या.

यामुळं या महिलेचा जागी मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा अधिक तपासही पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT