सातारा : पतीला निलंबित केल्याने पत्नीने सीईओंच्या दालनात गोंधळ घातला असून जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केलंय. त्याचा जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्याची पत्नी आली. संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याच्या पत्नीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ जिल्हा परिषदेमध्ये (Satara Zilla Parishad) तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या झालेल्या प्रकारामुळे झेडपीत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
पतीला निलंबित केल्याने पत्नीने सीईओंच्या दालनात गोंधळ घातला आहे.
दरम्यान, सदर अधिकारी कोरेगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करत होता. कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने औषध निर्माण अधिकाऱ्याला काढले. त्याचा जाब विचारण्यासाठी महिलेने जिल्हा परिषदेमध्ये धाव घेतली. महिलेने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (Officer Vinay Gowda) यांच्या दालनात गोंधळ घातला. विविध प्रश्नांची सरबत्ती करत तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या महिलेस शांत राहण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
सीईओंच्या सुरक्षा रक्षकाने शहर पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ झेडपीत महिला पोलीस कर्मचारी दाखल झाल्या. संबंधित महिलेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेवून तुमची काय तक्रार आहे ते त्यांच्याकडे द्या, असे सांगितले. तरीही ती महिला दालनाबाहेर बराच वेळ थांबली होती. शेवटी अन्य कर्मचाऱ्यांनी महिलेची समजूत काढत आरोग्य विभागात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर ती महिला आरोग्य विभागात गेली. या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या झालेल्या प्रकारामुळे झेडपीत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.