सातारा

उमेद अभियानातील दहा लाख महिलांचा साेमवारी एल्गार..!

हेमंत पवार

कऱ्हाड ः उमेद करू नका ना उमेद...,  आम्हा महिलांची उमेद वाचवा...,  उमेद अभियान वाचवा गरिबी हटवा...,  असेल उमेदचा आधार... तर पडणार नाही सावकारीचा भार..., 10 सप्टेंबर चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करा..., असे फलक दाखवून कोणत्याही प्रकारची घोषणा न देता मुक आंदोलन केले. निमीत्त होते. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला ही स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना राबविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' कर्मचारी यांना बेरोजगार करू नये, उमेद अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप करु नये, या मागण्यांसाठी तालुक्यातील 'उमेद' अभियानातील महिला व कर्मचाऱ्यांनी नुकतेच पंचायत समिती झाडुन, स्वच्छता मोहीम राबवत गांधीगिरी आंदोलन केले. हे आंदोलन लक्षवेधी ठरले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी पुनर्नियुक्ती अनुषंगाने 10 सप्टेंबर रोजी अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रक जारी केले आहे. त्यामुळे कंत्राटी पुनर्नियुक्तीची प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे 10 सप्टेंबर किंवा त्यानंतर ज्यांचे करार संपुष्टात आले त्यांना जिल्हा अभियान कक्षाच्यावतीने कार्यमुक्त करण्यात आले.

हाथरस घटनेतील गुन्हेगारांना कठाेर शिक्षा द्या; क-हाडात महिला आक्रमक

त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार सहाय्यता समूहाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या एक लाख कुटुंबातील महिलांनी शासनाच्या या उमेद अभियानाचे खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या निर्णयाच्या निषेधार्थ विविध स्तरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उमेद अभियानाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे चालविण्याची प्रक्रिया करण्यात येऊ नये, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम ठेवावेत, त्यांना तात्काळ सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

एकवीरादेवी मंदिर उघडण्याची परवानगी हवीय 

या आंदाेलनचा पहिला टप्पा महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यात गाव पातळीवर कार्यरत महिलांनी प्रतिनिधिक स्वरुपात पंचायत समिती झाडुन स्वच्छता केली. प्रारंभी महिलांनी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व परिसर सोबत आणलेल्या झाडूने स्वच्छ केला.

नवरात्रोत्सवात भुईंजमध्ये भाविकांना प्रवेशबंदी : देवस्थान ट्रस्टचा निर्णय

शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती आहे. संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी राज्यातील १० लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (ता.12) राज्यात मूकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार आहाेत.

सातारा जिल्ह्यातही सोमवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहाेत. यामध्ये जिल्ह्यातील १० हजार महिला सहभागी होतील. त्यामुळे महिलांनी अभियानाला वाचविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतल्याचे महिलांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT