सातारा

मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गाचे काम रखडले; नागरिकांत संताप!

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील शेनवडी येथील रोळ फाट्यानजीकच्या ओढ्यावरील पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या पुलाच्या कामाला गती नसल्याने पुलाच्या बाजूला बनवलेल्या पर्याय रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असताना वाहतूक ठप्प होते. चिखलमय रस्त्यामुळेही वाहतूक करणे धोकादायक आहे. 

या पुलाच्या बाजूला बनवलेल्या पर्याय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकास तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. पावसाळ्यापासून रस्ता चिखलमय झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील रोळावरील फरशी पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मात्र, हे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु, अद्यापपर्यंत हे पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुरता भ्रमनिरास होत आहे. कामाकडे संबंधित ठेकेदार कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, अशी प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांमधून चर्चा आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT