World Environment Day esakal
सातारा

झाडं वाचवली तरच माणसं वाचतील; राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त बाळकृष्ण मालेकरांचं मत

​मुकुंद भट

ओगलेवाडी (सातारा) : प्रगत मानवास हवा, पाणी व ध्वनी संबंधीच्या प्रदूषणाच्या (Pollution) वाढत्या समस्या आव्हानात्मक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षारोपणाच्या धडक कार्यक्रमासाठी लोकचळवळ व जनजागृती गतिमान झाली पाहिजे, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. बाळकृष्ण मालेकर (Prof. Balkrishna Malekar) यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) 'ई सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. (World Environment Day If Trees Live Then People Will Live Told By Prof. Balkrishna Malekar)

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षारोपणाच्या धडक कार्यक्रमासाठी लोकचळवळ व जनजागृती गतिमान झाली पाहिजे.

प्रा. मालेकर यांनी विनामानधन पर्यावरण व प्रदूषणविषयक सुमारे 400 व्याख्याने आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर 150 व्याख्याने दिली आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते नाशिकचा "अनुबंधी' पुरस्कार त्यांना मिळाला असून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे.

प्रा. मालेकर म्हणाले, "कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. वातावरणात प्राणवायूचे प्रमाण 21 टक्के असले तरी भरमसाट लोकसंख्येने तेवढे प्रमाण राहिलेले नाही. हवेतील प्रदूषण वाढत आहे. घरे, रस्त्यांसाठी प्राणवायू व सावली देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होऊन पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. 50 वर्षांचे झाड 11 लाखांचा प्राणवायू देते. प्रदूषण नियंत्रण करते, जमिनीची धूप थांबते, थंडगार सावली देते. 50 वर्षांत 52 लाख रुपयांचा फायदा करून देते. सर्वांनी झाडे वाचवली तरच आपण वाचणार आहोत. इंधन वाचवण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे. ''

World Environment Day If Trees Live Then People Will Live Told By Prof. Balkrishna Malekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT