सातारा

दुसऱ्या महायुद्धातील जगप्रसिद्ध काच कारखाना बंद; नेहरू, टिळकांनी दिली होती कारखान्यास भेट!

मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : जगप्रसिद्ध ओगले काच कारखान्याची स्थापना 25 नोव्हेंबर 1916 रोजी झाली. त्याला काल 104 वर्षे पूर्ण होत आहेत. कारखान्याच्या काळातील कामगार व लोकांच्या जुन्या आठवणी आजही ताज्या आहेत. हा कारखाना बंद पडल्यानंतर लोकांची या भागात नवीन मोठा उद्योग उभारण्याची मागणी कायम आहे.
 
सन 1980 मध्ये कारखाना बंद पडला. त्यामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्राची मोठी घसरण झाली. शेकडो कामगार बेकार झाले. भागातील 15 खेड्यांतील कामगारांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यानंतर तरुणांच्या हातांना रोजगार देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने परिसरात मोठा उद्योग उभारण्याची मागणी जोर धरत आहे. जवळच राष्ट्रीय महामार्ग, मुबलक जागा, पाणी, वीज आणि मजुरांची अनुकूलता आहे. रेल्वे स्थानक, विमानतळ आदी दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जाळेही आहे. त्यामुळे नवीन उद्योगधंद्याची उभारणीस व वाढीस अनुकूलता आहे. ओगले यांच्या प्रभाकर कंदीलामुळे कऱ्हाड तालुका देशाच्या औद्योगिक नकाशावर आला. 

कारखान्याचे संस्थापक आत्मारामपंत ओगले यांनी 25 नोव्हेंबर 1916 रोजी येथे लहानशा झोपडीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पहिली काच तयार केली. ती औंधच्या संग्रहालयात आजही पाहावयास मिळते. दुसऱ्या महायुद्ध काळात टाटांना काच बाटल्यांचा पुरवठा या कारखान्यातून होत होता. कंदिलाचे सारे उत्पादन सरकारने घेतले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लोकमान्य टिळकांनी या कारखान्यास भेट दिली. 1962 मधील भारत-चीन युद्धात ओगल्यांच्या प्रभाकर कंदिलाने हिमालयाच्या कुशीत लढणाऱ्या भारतीय जवानांना मोलाची साथ करून ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT