Wrestler Anshu Malik esakal
सातारा

म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?; ऑलिंपिकसाठी अंशु मलिकची कझाकिस्तानात 'दंगल'

महिला कुस्तीगीर पैलवान अंशु मलिक यांनी ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : यशवंत सातारा कुस्ती संघाची महिला कुस्तीगीर अंशु मलिकने इतिहास घडवला. टोकिओ (जपान) ऑलिंपिक पात्रता मिळविण्यासाठी आलमटी (कझाकिस्तान) येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिंपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे. यशवंत सातारा कुस्ती संघाचे मालक व माजी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी ही माहिती दिली.

यशवंत कुस्ती संघाच्या महिला कुस्तीगीर पैलवान अंशु मलिक यांनी ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. त्यामुळे कुस्तीमध्ये खाशाबा जाधवांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळण्याकडे साताऱ्यासह भारतातील सर्व क्रीडाप्रेमींच्या नजरा लागणार आहेत. पै. मलिक हिने 57 किलो वजनगटात हे यश संपादन केले. ती हरियानातील असून, सध्या ती रोहटक (हरियाना) येथे बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

अंशु मलिकने यशवंत सातारा कुस्ती संघाकडून या खेळात सहभाग घेत चमकदार कामगिरी करत नोर्डिक पद्धतीत आपल्या पोलमधून सर्व लढती जिंकत टोकिओ ऑलिंपिक पात्रता मिळविण्यात यश मिळवले. कुस्ती संघाचे मालक व खंडाळा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कुस्तीपटूंनी अभिनंदन केले. भविष्यात ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाचे, यशवंत सातारा कुस्ती संघाचे नाव जगभर करावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव कुस्तीप्रेमींकडून झाल्याचे पाहण्यात आले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT