Chandrakant Patil
Chandrakant Patil sakal
सातारा

Chandrakant Patil : मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देणार - चंद्रकांत पाटील

हेमंत पवार

कुस्तीचा सराव करणारे मल्ल आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात राज्य सरकार वाढ करणार आहे.

कऱ्हाड - कुस्तीचा सराव करणारे मल्ल आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात राज्य सरकार वाढ करणार आहे. मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ देण्यात येणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी खेळाकडे करीयर म्हणून पहावे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयात तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, प्राचार्य अशोक. टी. पिसे, प्राचार्य व्ही. एस. बांदल, सहाय्यक संचालक सुधीर पवार, एम. आर. जाधव, प्राचार्य बी. आर. नंदनवार, प्राचार्य संजय परदेशी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. रा. का. पाटील, शाासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. किशोर बुराडे, प्राचार्य डॉ. सोनगे, डॉ. दत्तात्रय गर्गे यांच्यासह शासकीय तंत्र महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, कोवीडमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज तंत्रशिक्षण विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. देशातील तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्य शिक्षण देत आहे. यातून नवनवीन संशोधक निर्माण होत आहेत. याचा लाभ देशाच्या आर्थिक सुधारणेला होत आहे. खेळामुळे मानसिक, बौद्धिक, शारीरिक वाढ होण्यास मदत होते. खेळाडू सतत सराव करतात, त्यामुळे त्यांना दहावी, बारावी मध्ये ग्रेस गुण दिले जातात. कुस्तीचा सराव करणारे मल्ल व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे.

मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण विभाग चांगले संशोधक निर्माण करत आहे. केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देते. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी खेळाकडे करीयर म्हणून पहावे. तंत्रशिक्षण विभागातील अडचणीबाबत लवकरच चर्चा करून सोडवल्या जातील. तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पाडाव्या. यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या प्राचार्यांचाही सत्कारही करण्यात आला. डॉ. जाधव यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य पिसे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT