wrestling on mats through yatra Arjunveer Kaka Pawar satara sakal
सातारा

सातारा : यात्रा-जत्रांतूनही मॅटवरील कुस्त्या भरवा : अर्जुनवीर काका पवार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आलेल्या काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे असेल, तर मॅटशिवाय पर्याय नाही...

संजय शिंदे

सातारा : आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्यासाठी नवीन पिढीत मॅटवरील कुस्तीला महत्त्व दिले पाहिजे. अगदी यात्रा-जत्रांतूनही मॅटवरील कुस्त्या भरविल्या पाहिजेत, असे अर्जुनवीर काका पवार यांनी सांगितले. येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आलेल्या काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे असेल, तर मॅटशिवाय पर्याय नाही, असे ठामपणे सांगितले. श्री. पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र, पंजाबमध्ये खूप चांगले पैलवान आहेत. मात्र, ते मातीत कुस्त्या करतात. त्यामुळे प्रगती होत नाही. काही जुन्या पैलवानांनी पैसे मिळण्यासाठी दंगलीच केल्या.

त्यामुळे काहींची उतारवयात वाईट परिस्थिती झाली. नुकतीच आशियायी स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली. त्यामध्ये ३० खेळाडूंमध्ये २८ हरियानाचे होते. आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचे ग्रीक रोमन, फ्री स्टाइल व महिला यामध्ये समावेशच होऊ शकत नाही. त्यामुळे जिंकायचे तर लांबच राहिले. पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता. कोल्हापूरचा पैलवान जगात चमकला पाहिजे, ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कल्पना होती. आता नवीन पिढीला घरासह सर्वसामान्य जनतेतून पाठबळ मिळू लागले आहे. सरकारचे योगदान कमी आहे. सरकार माय-बाप आहे. क्रीडा खात्याचे योगदान नाही. सरकारने खेळाडूंना पाठबळ दिले पाहिजे. आशियायी कुस्ती स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळाले, की राज्य सरकार पोलिस उपअधीक्षक करते. आॅलिंपिकमध्ये सहभाग घेतला, तरी पोलिस उपअधीक्षक केले जाते, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कल्पना आहे.

त्यांचे कुस्तीपटूंना चांगले पाठबळ मिळते. मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीगीर परिषद स्थापन करून पैलवान सांभाळले. त्यांची आॅलिंपिकची तयारी करून घेतली. मोहोळ यांच्या काळात २० पैलवान आॅलिंपिकला गेले होते. त्यांच्यानंतर आॅलिंपिकला पैलवान गेले नाहीत.’’ सरकारवर अवलंबून न राहता माझा मुलगा आॅलिंपिकला कसा जाईल, याचा विचार पालकांनी केला पाहिजे. त्याची तयारी कशी करून घेता येईल, याकडे पाहिले पाहिजे, असा सल्ला देऊन श्री. पवार म्हणाले, ‘‘जोपर्यंत कुस्ती मातीवरून मॅटकडे वळेल तेव्हाच आॅलिंपिकमध्ये महाराष्ट्राचे जास्तीतजास्त पैलवान दिसतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी मॅटवरील कुस्त्या केल्या पाहिजेत. हरियाना सरकारची खेळासाठी ५०० कोटींची आर्थिक तरतूद आहे. त्या तुलनेत आपल्याकडे फारच कमी आहे.’’

आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून ३०० कुस्तीपटूंना प्रशिक्षण देत आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सगळ्या वजन गटात पैलवान आहेत. कालपर्यंत पाच सुवर्णपदक, एक सिल्व्हर, दोन ब्राँझ पदके मिळाली आहेत. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांत माझ्या हाताखालून राहुल आवारे, सूरज ऊर्फ नामदेव कोकाटे, उत्कर्ष काळे, आबासाहेब अटकाळे, अण्णासाहेब जगताप, गणेश जगताप, शिवराज ससे असे अनेक हिरे राज्याला दिले. अंगात मस्ती आहे. तोपर्यंत तालीम आहे. त्यामुळे मी अनेकांना नोकरीची वाट दाखवली. रेल्वेमध्ये सुमारे सव्वाशे जणांना नोकरी लावली, असेही त्यांनी सांगितले.

मामांची शिकवण लक्षात ठेवली

तुझ्या घरची परिस्थिती बिकट आहे. तू कुस्ती केल्याशिवाय काहीच करू शकणार नाही, ही माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार मामांची शिकवण लक्षात ठेवली. मामांनी कायम पाठबळ दिले. परिस्थितीचे चटके असल्यामुळे कुस्तीकडे झोकून दिल्याचे काका पवार यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT