सातारा

बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पसरणीतील युवकाचा मृत्यू

भद्रेश भाटे

वाई (जि.सातारा) : पसरणी (ता. वाई) येथील अजय विजय महांगडे (वय 22) या युवकाचा बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून सांडव्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. 22) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 

पसरणी येथील अजय महांगडे यांच्यासह अन्य सात जण बलकवडी धरणावर फिरायला गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास धरणावरील सिक्‍युरटी गार्ड जेवायला गेला असताना हा युवक सांडव्यानजीक सेल्फी घेत होते. या वेळी अजय सेल्फी घेण्यासाठी सांडव्यानजीक गेला. निसरड्या जागेवरून पाय घसरल्याने तो सांडव्यावरून खाली पडला. या वेळी सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरू होता. 

कोरोनाबाधित अंत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी; नागरिकांना लुबाडण्याचा प्रयत्न

अजयच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सांडव्यातील पाणी पूर्णपणे बंद करून स्थानिक युवकांच्या साह्याने रोप व ट्यूबच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास सांडव्यातून बाहेर काढण्यात आला. 

धक्कादायक! वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

अजय हा पल्बिंगची कामे करत होता. त्याचा मित्र परिवार मोठा होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजयच्या मागे आई, वडील, विवाहित बहीण, एक भाऊ असा परिवार आहे. 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT