Crime sakal
सातारा

तू मला आवडतेस; तू माझ्याशी लग्न कर...तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला पळवून नेऊन तुझ्याशी लग्न करेन'' असे म्हणून तरुणीला वारंवार त्रास देत

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सतरा वर्षीय पीडित तरुणीने एका तरुणाच्या वारंवार देत असलेल्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल झाली असून उपचारा दरम्यान या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सतरा वर्षीय पीडित तरुणी ही तळदेव येथील महाविद्यालयात शिकण्यास होती. झांजवड या गावातील नितेश शंकर जाधव या तरुणाने पीडित मुलीस महाविद्यालयात येता-जाता रस्त्यामध्ये अडवून ''माझे तुझ्यावरती प्रेम आहे.

तू मला आवडतेस..तू माझ्याशी लग्न कर, तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला पळवून नेऊन तुझ्याशी लग्न करेन'' असे म्हणून तरुणीला वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तरुणीस सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. याबाबतची खबर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तरुणीच्या आजोबांनी दिली असून महाबळेश्वर पोलिसांनी नितेश शंकर जाधव रा. झांजवड, ता. महाबळेश्वर या तरुणावर भा.द.वी ३०६ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. नी. संदीप भागवत, पो. हवा. नवनाथ शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT