Shivani Patil esakal
सातारा

Electric Bike ची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शाॅक; 23 वर्षीय युवतीचा मृत्यू

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

कऱ्हाड (सातारा) : इलेक्ट्रिक दुचाकीची (Electric Bike) बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. म्होप्रे इथं शुक्रवारी रात्री ही घटना घडलीय. शिवानी अनिल पाटील (वय २३) असं मृत्यू झालेल्या युवतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील शिवानी पाटीलची (Shivani Patil) इलेक्ट्रिक दुचाकी आहे. शुक्रवारी बाहेरगावी जाणार असल्यामुळं दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग तपासले. चार्जिंग कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवानीनं दुचाकीची बॅटरी काढली.

चार्जिंगला लावण्यासाठी ती घरामध्ये गेली. दरम्यान, बॅटरी चार्जिंगला लावताना अचानक शिवानीला शॉक लागला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तीला उपचारार्थ रुग्णालयात हलवलं. मात्र, उपचारावेळी तीचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात (Karad Police) झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT