सातारा

'अमर रहे' च्या घोषणांतून शेकडाे युवकांची हुतात्मा सुजित किर्दतांना अभिवादन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी आज (बुधवार) सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील वातावरण भरुन गेले होते. सिक्किम येथे रस्ता अपघातात हुतात्मा झालेल जवान सुजित किर्दत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून आलेल्या शेकडो नागरिकांनी चिंचणेर निंब येथील कृष्णा तीर भरून गेला होता. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात हुतात्मा "सुजित किर्दत' यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडाे युवक जमले हाेते.

चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची ग्रामस्थ, नातेवाईक तसेच पंचक्रोशीतील नागरीक वाट पहात होते. आज (बुधवार) दुपारी त्यांचे पार्थीव चिचंणेर निंब येथे आणण्यात आले. हुतात्मा किर्दत यांच्या अंत्यसंस्काराची कृष्णेच्या तीरावर व्यवस्था केली होती. पार्थिव येताच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समस्त नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच त्यांच्या कुटुंबियांनी पार्थिव पाहताच केलेला आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकत होता.

कुत्र्यांच्या भुंकण्याने पाटील कुटुंबिय जागे झाले, पाहतात तर काय ? बिबट्या दारात
 
फुलांनी सजविलेल्या वाहनात लष्करी जवानांनी पार्थिव ठेवले. चिचणेर निंबमधून निघालेल्या या अंत्ययात्रेत नागरिक मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. अगदी शिस्तीत अंत्ययात्रा कृष्णा तीरी चालली होती. वाटेत नागरिक पार्थिवावर फुलांची उधळण करत होते. समस्त युवा वर्ग हुतात्मा जवान सुजित किर्दत अमर रहेच्या घोषणा अखंडपणे देत होते. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT