सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कमी पडणारे बेड यातूनच केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याने जिल्हा परिषदेच्या सभेत चर्चा होऊन काहीतरी ठोस निर्णय निघण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे, तसेच कोरोनासाठी लागणाऱ्या संरक्षक उपाययोजनांच्या साधनांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदस्यांना विचारात न घेताच केली आहे. त्यासोबत समाजकल्याण व पाणीपुरवठा विभागाचा परत गेलेला निधी यावरून जिल्हा परिषदेच्या आजच्या सभेत सदस्यांकडून अधिकारी टार्गेट होणार का, याची उत्सुकता आहे.
कास पठार बहरले; रंगीबेरंगी रानफुलांची उधळण
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज (बुधवार, ता. नऊ) दुपारी एक वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या वेळेत सभेसाठी केवळ दहा ते 12 विषयच चर्चेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये काही विभागांच्या कार्यालयांचे पुनर्नियोजन व जुन्या कार्यालये पाडून तेथे नवीन कार्यालये बांधणे यातील प्रमुख विषय आहे; पण सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळणारे उपचार योग्य पद्धतीने होतात का, बेड कमी पडत असताना त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या काही आरोग्य केंद्रांत सोय करता येऊ शकते का, याविषयांवर चर्चा होऊन निर्णय घेणे अपेक्षित आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, तर विरोधी सदस्यांत एकमत नसल्यामुळे विरोधकांचा दबदबा पाहायला मिळत नाही.
ग्रंथालयीन कर्मचारी मानधनाविना, अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षाच
त्यामुळे सभेत कोणत्यातरी विषयावरून शासकिय अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो; पण आता कोरोनाच्या परिस्थितीत तातडीने उपचार, तसेच बेडची सुविधा होण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन काहीतरी उपाययोजना करण्यासाठी या सभेत निर्णय घेणे अपेक्षित आहे. या वेळच्या सभेत कोरोनासाठी लागणाऱ्या सुरक्षा साधनांची खरेदी करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदस्य व पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलेले नाही. त्याबाबत सर्व पदाधिकारी व सदस्यांत नाराजी आहे; पण हा मुद्दा या सभेत चर्चेला घेतला जाणार का, याची उत्सुकता आहे.
सातारकरांनो, या दिवशी तुमच्या भागात येणार नाही पाणी!
तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व समाजकल्याण विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी परत गेला आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांना बसणार आहे. यावरूनही सदस्य व पदाधिकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाणीपुरवठा व समाजकल्याण विभागाचे अधिकारी टार्गेट होण्याची शक्यता आहे.
..अखेर सातारच्या नगराध्यक्षांनी नगरविकासकडे मागितले मार्गदर्शन!
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.