Zilla Parishad Satara sakal
सातारा

Zilla Parishad Satara : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता ‘अंकुर बालशिक्षण’ जिल्हा परिषदेचा उपक्रम; शिक्षणाचे होणार मूल्यांकन, अभ्यासक्रम तयार

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मार्ट शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत ‘अंकुर बालशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मार्ट शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत ‘अंकुर बालशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. अंकुर बालवाडीचे शिक्षण तीन ते सहा वयोगटासाठी दिले जाणार असून, या उपक्रमांतर्गत बालकांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजी भाषेचा समन्वय साधून बालकांसाठी अभ्यासक्रम बनविला आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ‘अंकुर बालशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू होणार असून, त्यासाठी पर्यवेक्षिका व प्रत्येक केंद्रातील दोन सेविकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण भागात एकूण चार हजार ५६० अंगणवाडी केंद्र असून, पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी संख्या सुमारे पाऊण लाख आहे. या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी उपक्रमांतर्गत अंकुर बालवाडी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीमध्ये राज्य शासनामार्फत अंगणवाडीतील बालकांसाठी हा अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून घेण्यात येत होता; परंतु बालकांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रम लेखन सामग्रीचा अभाव होता. यासाठी अंकुर बालशिक्षणासाठी तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. या उपक्रमासाठी २०२३ व २४ च्या जिल्हा परिषद सेस निधीमधून एक कोटी १८ लाख रुपयांची तरतूद केली आहे.जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता ‘अंकुर बालशिक्षण’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT