Corona Team Esakal
सातारा

कोरोनाबाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा: प्रदीप विधाते

सुस्मिता वडतिले

कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष न करता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आला असला तरी चार तालुक्यांतील बाधित आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे. कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष न करता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची मासिक सभा उपाध्यक्ष विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी डॉ. अभय तावरे, डॉ. भारती पोळ, उषादेवी गावडे, शारदा ननावरे, भाग्यश्री मोहिते, राजाभाऊ शेलार, शंकर जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रमोद शिर्के व अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असले, तरी त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. यामध्ये सुधारणा करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करण्याच्या सूचना श्री. विधाते यांनी केली.

जिल्ह्यात डेंगी, चिकुनगुनिया व अन्य साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गावोगावी डेंगी, चिकुनगुनियाचे रुग्ण कसे कमी होतील. त्याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना विधाते यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तालुक्याचे पंचायत समिती सभापती, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तालुक्यांमध्ये संयुक्त बैठक घेऊन साथीच्या रोगांना अटकाव करण्यासंदर्भात नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी विधाते यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित रुग्णांचा आढावा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रम, क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, नागरी नोंदणी पद्धती यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामाचा आढावा घेण्यात आला.

मंजूर कामे सुरू करा: विधाते

बांधकाम समितीची सभा उपाध्यक्ष विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बांधकाम समितीच्या काम वाटप समितीच्या बैठकीत ज्या कामांच्या काम वाटपाच्या शिफारशी झाल्या आहेत. त्या कामांच्या लवकरात लवकर वर्कऑर्डर काढून ती कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना विधाते यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. पूरग्रस्त ठिकाणचे पंचनामे त्वरित करून त्याचा परिपूर्ण अहवाल सादर करण्याच्याही सूचना करण्यात आली. या वेळी धैर्यशील अनपट, मनोज पवार, सागर शिवदास, बापूराव जाधव, बाबासाहेब पवार, अर्चना रांजणे, संगीता मस्कर व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT