सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील sakal
सातारा

सातारा : जिल्हा रुग्णालयातील चोरीची होणार चौकशी

डॉ. सुभाष चव्हाणांनी घेतली झाडाझडती; संबंधितांवर कठोर कारवाईची गरज

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा रुग्णालयामधून रुग्णांसाठी महत्त्‍वाच्या असणाऱ्या काही यंत्रांच्या चोरीच्या प्रयत्नाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या संदर्भातील परिचारिकेच्या आलेल्या अहवालावरून संबंधितांची झाडाझडती घेण्याबरोबरच चौकशी लावण्यात आली आहे. मात्र, चौकशीअंती जिल्हा रुग्णालयातील अशा महाभागांवर जरब बसेल, अशी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. तरच, सर्वसामान्यांच्या पैशाच्या अपव्ययाला लगाम लागू शकेल.

जिल्ह्यातील सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशी आरोग्य विभागाची व्यवस्था आहे. त्यातही तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुविधा, शस्त्रक्रिया, गंभीर आजारांवरील उपचारासाठी नागरिक जिल्हा रुग्णालयात येत असतात. कोरोना संसर्गापूर्वी या सुविधांचे प्रमाण जिल्हा रुग्णालयातही कमी होते. दोन वर्षांपूर्वी लॉकडाउननंतर आरोग्य सुविधांतील या कमतरता प्रशासन व शासनाला प्रकर्षाने जाणवल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कायापालट म्हणता येईल, अशा पद्धतीचे आमूलाग्र बदल गेल्या दोन वर्षांत झाले. विविध विभागांत लागणाऱ्या अत्यावश्यक यंत्रणाही आल्या. शस्त्रक्रियागृहाचेही नूतनीकरण झाले. जिल्हा रुग्णालयात अशा सुविधा वाढल्यामुळे नागरिकांनाही त्याचा लाभ मिळू लागला आहे. परंतु, नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या या यंत्रणांचे जतन करण्याचे काम योग्य प्रकारे होत नव्हते.

काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रियागृहातील मशिनच चोरीला गेले. त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे चुकीच्या व्यक्तींना आणखी प्रोत्साहन मिळाले. त्यातच गेल्या काही दिवसांत जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे कुलूप तोडण्याचा प्रकार समोर आला. त्याचीही चौकशी झाली नाही. त्यानंतर रुग्णालयातून मॉनिटर चोरीस जाण्याचा प्रयत्नही एका परिचाररिकेमुळे समोर आला. रुग्णालयात सुरक्षारक्षक असूनही खुलेआम चोरीचे प्रकार सुरू होते. त्याबाबत कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पैशांतून घेतलेल्या उपकरण, सामग्री चोरट्यांना अभय कोणाचे? असा प्रश्न दै. ‘सकाळ’च्या माध्यमातून उपस्थित केला होता.

डॉ. सुभाष चव्हाण यांनी त्याची दखल घेत संबंधितांची झाडाझडती घेतली. दरम्यान, या प्रकाराबाबत परिचारिकेने त्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

प्रसंगी गुन्हे दाखल करा...

जिल्हा रुग्णालयातील उपकरणे ही सर्वसामान्यांच्या उपचारात ‍महत्त्‍वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा आवश्यक आहे. त्याचे रक्षकच भक्षक होऊ लागले तर, ते धोकादायक आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांना जरब बसणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रसंगी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिकाही जिल्हा शल्यचिकित्सकांना घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT