BMW Bike Sakal
विज्ञान-तंत्र

BMW Bike: भारतात येतेय BMW ची धमाकेदार बाईक, तब्बल १०००cc इंजिनसह मिळतील अफलातून फीचर्स

बीएमडब्ल्यू लवकरच भारतीय बाजारात आपली नवीन बाईक लाँच करणार आहे. या बाईकची किंमत २५ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

BMW New Bike Launch Soon: बीएमडब्ल्यू मोटर्ड लवकरच भारतीय बाजारात आपल्या नवीन बाईकला लाँच करणार आहे. कंपनी भारतात १० डिसेंबरला आपली नवीन स्पोर्ट्स बाईक 2023 BMW S 1000 RR ला लाँच करणार आहे. कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये या बाईकला जागतिक बाजारात लाँच केले आहे. ही बाईक नवीन इंजिन, चेसिस, फ्रेम आणि जबरदस्त फीचर्ससह येईल.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

2023 BMW S 1000 RR मध्ये कंपनी ९९९सीसी लिक्विड कूल्ड, ४ सिलेंडर इंजिन देणार आहे. हे इंजिन २०६.५ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलची पॉवर ३ बीएचपीने वाढवण्यात आली आहे. १००० सीसीच्या इंजिनमुळे ही बाईक जबरदस्त परफॉर्म्स प्रदान करते.

या बाईकमध्ये कंपनीने ६ स्पीड गियरबॉक्ससह क्विकशिफ्टर दिले आहे. ही बाईक पूर्णपणे स्पोर्टी आणि अग्रेसिव्ह डिझाइनसह येते. बाईकमध्ये फुल फेयरिंग, फ्लिप-ऑन हँडल बार, जबरदस्त फ्यूल टँक, स्पोर्टी सीट आणि शार्प रियर पॅनेल मिळते.

बाईकचे डिझाइन देखील खूपच शानदार आहे. या बाईकमध्ये ग्राउंड क्लिअरेंस कमी दिले आहे. त्यामुळे शानदार हाय-स्पीड स्टेबिलिटी मिळते. बाईकमध्ये १४५७ एमएमचे व्हील बेस दिले आहे. याच्या स्विंगआर्ममध्ये एडजस्ट फंक्शन दिले आहे, ज्यामुळे राइडरसाठी बाईकची उंची कमी देखील करता येईल.

2023 BMW S 1000 RR मध्ये मिळतील दमदार फीचर्स

फीचर्सबद्दल सांगायचे तर 2023 BMW S 1000 RR मध्ये फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर,ब्रेक असिस्ट,ड्यूल चॅनेल एबीएस, स्लाइड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक सूट सारखे फीचर्स दिले आहेत. बीएमडब्ल्यूच्या या बाईकला भारतात पूर्णपणे बिल्ड यूनिट स्वरुपात आयात केले जाईल. BMW S 1000 RR ची किंमत जवळपास २० ते २५ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT