2023 KTM 250 Adventure  esakal
विज्ञान-तंत्र

2023 KTM 250 Adventure बाइक मार्केट मध्ये दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

गेल्या काही दिवसांपासून अॅडव्हेंचर बाइकबाबत असलेली प्रतिक्षा संपली

सकाळ डिजिटल टीम

2023 KTM 250 Adventure : गेल्या काही दिवसांपासून अॅडव्हेंचर बाइकबाबत असलेली प्रतिक्षा संपली आहे. केटीएमने बाइकप्रेमींसाठी 2023 केटीएल 250 अॅडव्हेंचर बाइक लाँच केली आह. अपडेटेड इंजिनसह या गाडीची एक्स शोरुम किंमत 2,46,651 रुपये आहे. या बाइकमध्ये ओबीडी 2 चा सपोर्ट आहे.

ही बाइक नव्या एमिशन नियमांसह सादर केली आहे. या बाइकमध्ये 248.76 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल, DOHC इंजिन पॉवर आहे. ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड गियरबॉक्स आहेत. लाँग ड्राईव्हसाठई ही बाइक जबरदस्त आहे. केटीएमच्या अॅडव्हेंचर बाइकच्या विंडशील्डच्या पोझिशनला बदलता येऊ शकते. या गाडीची 14.5 लिटरची टाकी फूल केली तर 400 किमी पर्यंत धावू शकते.

KTM 250 Adventure च्या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये पूर्वीसारखीच आहेत. यात एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट आणि एलईडी टर्न इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. तसेच पूर्ण-डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.

ऑफ-रोड अनुभवासाठी ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टम देखील देण्यात आली आहे. रायडरला स्लिपर क्लच आणि 12V सॉकेटसह भरपूर सपोर्ट मिळेल. भारतातील अॅडव्हेंचर बाइक्स सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स आणि रॉयल एनफिल्ड हिमालयन सारख्या बाइक्सशी स्पर्धा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT