Chemistry Nobel Prize eSakal
विज्ञान-तंत्र

Chemistry Nobel Prize : रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा; मोउगी बावेंडी, लुईस ब्रुस अन् अ‍ॅलेक्सी एकिमोव्ह यांना मिळाला पुरस्कार

Nobel Prize 2023 : यावर्षीच्या रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

Sudesh

यावर्षीच्या रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मोउगी बावेंडी, लुईस ब्रुस अन् अ‍ॅलेक्सी एकिमोव्ह या तीन वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषण केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मोउंगी जी. बावेंडी हे अमेरिकेतील केंब्रिज येथे असणाऱ्या एमआयटी मध्ये प्रोफेसर आहेत. लुईस ब्रुस हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह हे न्यूयॉर्कमधील नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजी इनकॉर्पोरेटेड या संस्थेत कार्यरत आहेत.

या तिघांनी क्वांटम डॉट्सचा शोध लावला. हे अगदी छोटे नॅनोपार्टिकल असतात. हे एवढे छोटे असतात, की त्यांच्या आकारावरुन त्यांचे गुणधर्म ठरतात. या शोधाचा टेक्नॉलॉजी ते मेडिकल अशा सर्व क्षेत्रांमध्ये मोठा फायदा होणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबतचं संशोधन सुरू होतं. अ‍ॅलेक्सी यांनी 1980 च्या दशकात एक संशोधन केलं. यामध्ये रंगीत काचेमध्ये आकार-आधारित क्वांटम इफेक्ट तयार करण्यात त्यांना यस मिळालं होतं. यानंतर काही वर्षांनी लुईस ब्रुस यांनी एखाद्या फ्लुईडमध्ये असणाऱ्या कणांमध्ये क्वांटम स्तरावर होणाऱ्या बदलांसाठी त्यांचा आकार महत्त्वाची भूमिका बजावतो हे दाखवून दिलं होतं.

1993 साली क्वांटम डॉट्सचे केमिकल प्रॉडक्शन करून मोउंगी बावेंडी यांनी या क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी अगदी परफेक्ट असे क्वांटम डॉट्स तयार केले होते. यामुळे या पार्टिकल्सना विविध उपकरणांमध्ये वापरणं शक्य झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT