coffee
coffee 
विज्ञान-तंत्र

रोज तीन कप कॉफी आरोग्यासाठी चांगली

वृत्तसंस्था

साउथहँप्टन - कॉफी पिणे चांगले का वाईट यावर अनेकदा तुम्ही चर्चा केली असेल. पण, तुम्हाला कॉफी आवडत असेल तर आता दिवसाला तीन ते चार कप कॉफी प्यायला काहीच हरकत नाही. नव्या संशोधनानुसार दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साउथहँप्टन विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच याबाबत एक अहवाल सादर केला. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कॉफी पिणाऱ्यांमध्ये यकृतचे आजार आणि काही प्रकारचे कर्करोग यांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. असे असले तरी गरोदरपणात मात्र जास्त कॉफी पिणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

कॉफीच्या परिणामांचा अभ्यास करण्यसाठी संशोधकांनी दोनशेहून अधिक व्यक्तींचा अभ्यास केला. यामध्ये दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये हद्यविकाराचे प्रमाण कमी असल्याचेही सिद्ध झाले आहे. 

या संशोधनातील सहअभ्यासक प्राध्यापक पॉल रॉडरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफी पिण्याचे फायदे असले तरी, निरोगी आरोग्यासाठी आणि गंभीर आजारापासून सुटका होण्यासाठी फक्त कॉफी हेच कारण आहे, असे म्हणता येणार नाही. कॉफी पिणाऱ्याचे वय, ध्रूमपानाची सवय, नियमित व्यायाम हे मुद्देही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉफी पिणाऱ्यांनी 'हेल्दी कॉफी' प्यावी, असेही हे अभ्यासक सांगतात. म्हणजेच कॉफीबरोबरचा चमचमीत फराळ, कॉफीत घातलेली अतिरिक्त साखर, दूध, क्रीम असे सगळे टाळावे.कॉफीसेवनाचे फायदे तपशीलवार समजून घेण्यासाठी काही काटेकोर शास्त्रीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती देखील संशोधकांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT