Women Safety Apps Sakal
विज्ञान-तंत्र

Women Safety Apps: ३१ डिसेंबरला पार्टीवरून मध्यरात्री घरी जाताय? महिलांच्या सुरक्षेसाठी उपयोगी येतील 'हे' अ‍ॅप्स

३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. या दोन दिवसात महिलांसोबत छेडछाडीच्या अनेक घटना समोर येतात. अशावेळी काही अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Best Women Safety Apps: २०२२ संपायला आणि २०२३ च्या स्वागतासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही देखील मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्याचा, बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच केला असेल. मात्र ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. या दोन दिवसात महिलांसोबत छेडछाडीच्या अनेक घटना समोर येतात. तसेच, रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी टॅक्सी, कॅब देखील मिळत नाही. अशावेळी तुम्ही मोबाइल अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

सेफ्टीपिन

खास महिलेंच्या सुरक्षेसाठी या अ‍ॅपला बनवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळा ज्या महिला कामावर जातात, त्यांना हे अ‍ॅप उपयोगी येईल. या अ‍ॅपवर यूजर्सला सेफ्टी ऑडिट करण्यास सांगितले जाते. यूजर्सला त्यांच्या भागातील सुरक्षेबाबत १ ते ५ दरम्यान रेटिंग देण्यास व फोटो अपलोड करण्यास सांगितले जाते. तुम्ही जर असुरक्षित भागातून जात असल्यास अ‍ॅप तुमच्या कुटुंबाला नॉटिफिकेशन पाठवेल.

वुमेन सिक्योरिटी अ‍ॅप

हे अ‍ॅप इमर्जेंसीच्या वेळी यूजरच्या आवाजातील ४५ सेकंदाचा मेसेज आपातकालीन नंबरवर पाठवेल.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

शेक2 सेफ्टी (Shake2Safety)

३१ डिसेंबर, १ जानेवारीला पार्टीसाठी बाहेर जात असाल तर सुरक्षेसाठी या अ‍ॅपचा वापर करू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ फोनच्या पॉवर बटनला चार वेळा दाबून ठराविक नंबरवर मेसेज पाठवू शकता. तसेच, फोन हलवून देखील मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.

बीसेफ (bSafe)

bSafe अ‍ॅपद्वारे यूजर्सचे लोकेशन मित्र-मैत्रिणी व घरच्यांना समजू शकेल. संकटाच्या वेळी अ‍ॅपवरून लोकेशन व मेसेज देखील पाठवता येईल.

स्मार्ट 24x7

संकटाच्यावेळी अ‍ॅपवरून पॅनिक बटन दाबून मेसेज पाठवता येते. या अ‍ॅपमध्ये पॅनिक बटन फीचर देण्यात आले आहे.

हेही वाचा: Jio 5G: जिओचे नववर्षाचे गिफ्ट! महाराष्ट्रातील 'या' शहरांसह ११ ठिकाणी ५जी सेवा सुरू; मोफत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT