एआय निर्मित फोटो ओळखण्याचे सोपे मार्ग.  esakal
विज्ञान-तंत्र

AI Generated Images : क्षणात ओळखा फोटो खरा आहे की खोटा ! वापरुन पहा 'या' ५ ट्रिक्स

Fake Images : डीपफेक सारख्या गोष्टींपासून वाचवण्याचे सोपे मार्ग (How to find AI Generated Images)

सकाळ वृत्तसेवा

Artificial Intelligence : आधुनिक एआय (AI) तंत्रज्ञान इतके वेगवान आणि प्रो बनले आहे की त्याच्या मदतीने तयार केलेले फोटो खरे आहेत की खोटे हे ओळखणे कठीण होऊन बसते. यातून डीपफेक (Deepfake) सारखे प्रकार देखील घडलेले आहेत. अश्यात काही खास गोष्टींचा विचार केल्यास हे कृत्रिम बुद्धीमत्ता (AI Generated Images) वापरुन बनवलेले फोटो ओळखता येऊ शकतात. अशा काही सोप्या तंत्रांबद्दल जाणून घेऊया. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेले फोटो सहज ओळखू शकता.

1. फोटोचे बारकाईने निरीक्षण करा : (Find Fake Photos) कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेल्या फोटोंमध्ये ब्लर रेषा किंवा बॅकग्राऊंड असू शकते. असे असलेले फोटो बनावटी दिसू शकतात. विशेषत: केस, पार्श्वभूमी आणि गुंतागुंतीचे (Complicated) दिसून येते.

अवास्तव (Irrelevent things) गोष्टींचा शोध घ्या ज्यांचा फोटोमध्ये संबंध नाहीये. जसे प्रतिबिंबे, असमान वस्तू किंवा असमान प्रकाश.

2. चेहऱ्यावरची वैशिष्ट्ये तपासा : कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेल्या व्यक्तीचित्रांमध्ये, डोळे वेगळे दिसू शकतात किंवा pupil मध्ये दिसणारे प्रतिबिंब वेगळे असू शकते. भुवया देखील असमान किंवा अनैसर्गिक आकाराच्या दिसू शकतात.

दात अतिशय डार्क किंवा ब्लर दिसू शकतात आणि कानांचा आकार किंवा स्थान असामान असू शकते.

3. रिव्हर्स इमेज सर्च वापरा : गुगल इमेजेस किंवा इतर रिव्हर्स इमेज सर्च इंजिन्स असे फोटो आधी कुठे वापरले गेले आहेत का किंवा त्याच्या सारखी ऑनलाइन आवृत्ती आहे का हे शोधण्यास मदत करू शकतात.

एखादा फोटो फक्त विशिष्ट प्रकारच्या वेबसाइटवर दिसत असल्यास तो कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेला असण्याची शक्यता असते.

4. मेटाडेटा तपासा : फोटो फाइल्समध्ये मेटाडेटा असतो ज्यातून कधीकधी त्यांच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकते. कॅमेरा मॉडेल, वापरलेले सॉफ्टवेअर आणि इतर तपशीलांबद्दल माहितीसाठी EXIF डेटा पहा. AI-निर्मित फोटोंमध्ये जनरेटिव्ह सॉफ्टवेअर वापरण्याचे संकेत देणारा मेटाडेटा असू शकतो किंवा त्यामध्ये कॅमेऱ्याची माहिती नसू शकते.

5. AI डिटेक्शन टूल्स वापरा : AI निर्मित कंटेंट शोधण्यासाठी बनवलेली विशेष AI टूल्स आहेत. Deepware Scanner, Sensity AI इत्यादी टूल्स इमेजेसचे विश्लेषण करू शकतात आणि विविध मार्कर आणि नमुनांच्या आधारे एखादा फोटो AI निर्मित आहे का याची शक्यता सांगू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT