Whatsapp Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp: तब्बल ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबरची सुरू आहे ऑनलाइन विक्री, हॅकर्स ग्राहकांच्या शोधात

व्हॉट्सअ‍ॅपच्या कोट्यावधी यूजर्सचा डेटा लीक झाल्याचे समोर झाले आहे. हॅकर्सने जवळपास ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबर्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp data leak: सायबर गुन्हेगार यूजर्सचा खासगी डेटा चोरी करून त्याची विक्री करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता जवळपास ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबरच्या डेटा बेसची सायबर गुन्हेगार विक्री करत असून, यासाठी ग्राहकांचा शोध सुरू आहे. रिपोर्टनुसार, एका प्रसिद्ध हॅकिंग कम्युनिटी फोर्मने जाहिरात पोस्ट केली आहे. या जाहिरातीत हॅकर्सने त्यांच्याकडे ४८.७ कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबर्स असल्याचा दावा केला आहे. हा डेटा बेस वर्ष २०२२ चा आहे. या डेटा बेसमधील सर्व व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

८४ देशांच्या यूजर्सचे आहेत नंबर

रिपोर्टनुसार, या डेटाबेसमध्ये ८४ देशांच्या व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या नंबर्सचा समावेश आहे. या डेटा बेसमध्ये जवळपास ३.२ कोटी अमेरिकन यूजर्सचा नंबर आहे. या व्यतिरिक्त इजिप्तमधील यूजर्सच्या नंबर्सचा देखील यात समावेश आहे. डेटा बेसमध्ये इजिप्तच्या ४.५ कोटी, इटलीच्या ३.५ कोटी, सौदी अरेबियाच्या २.९ कोटी, फ्रान्सच्या २ कोटी आणि तुर्कस्तानच्या २ कोटी यूजर्सचा नंबर आहे.

याशिवाय, डेटा बेसमध्ये रशियातील १ कोटी व ब्रिटनमधील १.१ कोटी फोन नंबर्स देखील आहेत. हँकर्सने या डेटा बेसमधील काही नंबर देखील शेअर केले आहेत. यात ब्रिटनमधील १०९७ आणि अमेरिकेतील ८१७ नंबर्स आहेत.

हे सर्व मोबाइल नंबर्स व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू असल्याचे देखील समोर आले आहेत. मात्र, हे नंबर कसे मिळाले याबाबतची कोणतीही माहिती हॅकरने दिलेली नाही. दरम्यान, याबाबत व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. हॅकर्सने या नंबर्सला स्क्रॅपिंगद्वारे गोळा केले असण्याची शक्यता आहे.

या लीक झालेल्या नंबर्सचा वापर मार्केटिंग, फिशिंग व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. सतत वाढणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीसाठी देखील या डेटा बेसचा वापर केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT