5G Network esakal
विज्ञान-तंत्र

5G Network: भारतात 5Gची एन्ट्री पण 4Gचं काय? तुमच्या सिमचं पुढे काय होणार ते वाचा

5G सिम मार्केटमध्ये आल्यानंतर आता 4G संपूर्णपणे निरूपयोगी तर होणार नाही ना अशीही भिती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

भारतात आज पंतप्रधान नरेद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे आता आणखी वेगवान 5G सेवा भारतात सुरू झाली आहे. मात्र 5G सेवा सुरू झाल्यानंतर 4Gचं काय होणार असाही प्रश्न अनेकांना पडलाय. 5G सिम मार्केटमध्ये आल्यानंतर आता 4G संपूर्णपणे निरूपयोगी तर होणार नाही ना अशीही भिती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.

5G वापरासाठी मोबाईल बदलावा लागणार का?

5G सेवेसाठी मोबाईल तर बदलावा लागणार नाही ना असाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालाय. तर माहितीसाठी सध्या लाँच होणाऱ्या जवळपास सगळ्याच फोनमध्ये 5G सेवा कार्यक्षम आहे. काही कंपन्यांनी मोबाईलची किंमत वाढू नये म्हणून 5G ऑप्शन दिलेलं नाही. त्यामुळे आता 5G वापरापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये 5G कार्यक्षम असणार आहे की नाही ते तुम्हाला चेक करावे लागणार आहे.

5G लाँचिंगनंतर आता 4G बेकार होणार का?

4G सिम 5G मध्ये बदलता येणार का? असाही प्रश्न अनेकांना पडलाय. 5G सर्व्हिसची सेवा घेण्यासाठी कोणतंही नवीन सिम घ्यावं लागणार नाही. 4G सिममध्येच तुम्हीच 5G सेवेचा वापर करु शकता. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये 4G सेटिंग ऑन करावी लागणार आहे. रिचार्जही 5G पॅकनुसारचं करावं लागणारआहे. ही सेवा एअरटेल ग्राहकांसाठी (Airtel Users) आहे. पण Jio यूसर्ससाठी 5G वापरण्यासाठी आपलं जूनं सिम बदलावलं लागू शकतं.

पहिल्या टप्प्यात या १३ शहरांत सुरू होणार 5G सेवा

दिवाळीपर्यंत देशातील 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT