'Bee Heavy Molasses sakal
विज्ञान-तंत्र

'Bee Heavy Molasses' : इथेनॉलसाठी ६.७ लाख टन ‘बी हेवी मोलॅसिस’ला परवानगी ; केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मोठा दिलासा

केंद्राने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी ६.७ लाख टन बी-हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होईल. साखर उद्योग या मागणीसाठी सातत्याने आग्रही होता.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, नवी दिल्ली: केंद्राने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी ६.७ लाख टन बी-हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होईल. साखर उद्योग या मागणीसाठी सातत्याने आग्रही होता. साखरेच्या किमती अपेक्षित प्रमाणात वाढत नसल्याने धास्‍तावलेल्‍या साखर कारखान्यांना या निर्णयाने संजीवनी मिळाली आहे. आसवनी निहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मोलॅसीसच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात येत आहेत.

राष्‍ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माहितीनुसार, ‘या परवानगीने बी हेवी मोलॅसिसच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांची रक्कम वापरता येणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २३०० कोटी रुपये रक्कम देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना उपलब्ध होईल. यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व त्याच्या फलस्वरूप स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यात मदत होईल,’ असा दावा महासंघाने केला आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या आढाव्यात देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता.

...असा होईल फायदा

सध्या देशातील गाळप हंगाम संपत आला आहे. कारखाने बंद झाले असले, तरी अनेक कारखान्यांकडे बी हेवी मोलॅसिस शिल्लक आहे. परवानगीअभावी हे मोलॅसिस पडून होते. या निर्णयामुळे ते आता इथेनॉल निर्मितीसाठी वापरता येईल. त्यातून चांगली रक्कम कारखान्यांना मिळू शकेल. याचा फायदा शेतकऱ्यांना बिले देण्यासाठी होईल.

या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. कारखान्यांना बी हेवी मळीच्या शिल्लक साठ्यांत अडकलेली रक्कम मिळू शकेल. आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना उसाची रक्कम वेळेत व पूर्णपणे मिळण्यास मदत होईल. या प्रक्रियेमधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाईल.

- हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT