Aadhaar Card Photo Update esakal
विज्ञान-तंत्र

Aadhaar: आधारवरील नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकता?

Aadhaar : आधार कार्डवरील फोटो, नाव किंवा पत्ता आपण बदलू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Aadhaar Card : सध्या आधार हा अत्यंत महत्वाचा दस्तवेज झाला आहे. सध्या शाळा,महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने प्रत्येक आधार केंद्रांवर माहिती अपडेट करण्यासाठी गर्दी होत आहे. आता आधार क्रमांकासोबत मोबाईल नंबर,पॅनकार्ड जोडणे गरजेचे झाले आहे. नाहीतर नागरिकांना वेळेवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधारवरील माहिती अपडेट करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) नियम जारी केले आहेत. (How often can you change the name and address of Aadhaar?)

कितीवेळा बदल करू शकता?

जन्मतारीख : जन्मतारखेच्या तारखेत कधीच बदल करता येत नाही. केवळ ‘डाटा एन्ट्री’ करताना काही चूक झाल्यास फक्त एकदा आणि एकदाच अपडेट करता येते.

नाव : आधारवरील नावात दोनवेळा बदल करता येऊ शकते.

पत्ता : फक्त एकदाच बदल करणे शक्य आहे.

लिंग : यासंदर्भातील माहिती केवळ एकदाच अपडेट करता येईल.

या कामासाठी आधार हवेच-

नवीन मोबाईल सीम कार्ड

नवीन बॅंक खाते उघडणे

शाळेतील प्रवेश

शिष्यवृत्ती

शालेय शुल्कमाफी सवलतींसाठी

रेशन कार्ड काढणे

बॅंक कर्ज

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी

दुरूस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, विमा पॉलिसी

बॅंक स्टेटमेंट, पासबूक

पोस्ट ऑफिस स्टेटमेंट, पासबूक

रेशन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना,

विद्यूत बील, पाणी बील,टेलिफोन लॅन्डलाईन बील (तीन महिन्यांपेक्षा जास्त जुने नको)

मालमत्ता कर पावती( एका वर्षापेक्षा जास्त जुनी नको)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Governor Acharya Devvrat : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची ताकद'', महाराष्ट्राचे राज्यपालांचे प्रशंसोद्‌गार....

AUS vs IND, ODI: रोहित शर्मा ठरला मालिकावीर! पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, 'आता युवा खेळाडूंना योग्य मेसेज...'

Customs Rule: सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल! महसूल विभागाची महत्त्वाची घोषणा, कधीपासून लागू होणार?

कपिल शर्माचा बॉलिवूडमध्ये कमबॅक ! 'या' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये करणार काम

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार उत्तराखंड महोत्सवाचे उद्घाटन, महामंडळ सदस्यांनी घेतली भेट 

SCROLL FOR NEXT