modules
modules sakal
विज्ञान-तंत्र

Hatke - हायब्रीड वर्क मॉड्यूलशी जुळवून घेताना

सकाळ डिजिटल टीम

कोरोनानंतर घरातून काम करणे ही सामान्य गोष्ट बनवली आहे. हायब्रीड वर्क मॉड्यूल आणि पारंपारिक आणि डिजिटल कामाचे मिश्रण. व्यावसायिक आता आधुनिक कार्य पद्धतीचा अवलंबन करत आहेत. यामुळे कंपनीचा वेळ आणि संसाधने यांची बचत होत आहे. यामुळे व्यावसायिक नवीन हायब्रीड वर्क मॉड्यूलशी जुळवून घेताना दिसत आहेत. लोकांनी बदलासाठी तयार राहायला हवे तसेच होणाऱ्या बदलांना संधी म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. हायब्रीड वर्क मॉड्युल नोकरदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. लॉकडाऊनपासून व्यावसायिक वेगवेगळ्या पद्धती वापरून कर्मचाऱ्यांना अनुकूल वातावरण द्यायचा प्रयत्न करत आहेत.

हायब्रीड वर्क मॉड्यूलची संकल्पना:

काम करण्याचा नावीन्यपूर्ण मार्ग आहे.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि सोईस्कर पद्धतीने काम करता येते.

कंपन्यांमध्ये हे मॉड्यूल लोकप्रिय होत आहेत. कर्मचाऱ्यांना काय करायचे आहे, हे निवडण्याची परवानगी देतात.

कर्मचारी त्यांच्या वेळेनुसार अधिक उत्पादक आणि कार्यक्षम होऊ शकतात.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यावहारिक व वैयक्तिक जीवनात समतोल साधण्याची संधी मिळते. त्यांना अधिक शाश्वत करिअर मार्ग तयार करण्यास मदत करते.

हायब्रीड मोडमधील काम करण्याचे फायदे

जगातील कोणत्याही भागातून कर्मचारी कामावर घेऊ शकतो.

कोठूनही काम करण्याचे स्वरूप कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य अनुभवण्यास मदत करते, ज्यामुळे उत्पादकता वाढते.

कोणती काळजी घ्यायची?

वायरलेस वर्कप्लेस तयार करा

वायरलेस वर्कप्लेस असल्‍याने कर्मचाऱ्यांना पाहिजे तेव्‍हा हायब्रीड वर्क मॉड्युल ठेवण्‍यास मदत होईल.

डिजिटल डेटा क्लाऊडमध्ये ठेवा

सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड, डेटा आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स क्लाउडवर ठेवा. असे केल्याने, तुम्ही आणि तुमची टीम नेहमी एकमेकांसोबत जोडलेली असते.

कामाच्या धोरणांमध्ये सुधारणा

धोरणांमध्ये प्रामुख्याने गोपनीयता आणि सुरक्षितता यांचा समावेश होतो. हायब्रीड वर्क मॉड्यूल्ससह, कंपन्या विशेषतः डेटाबद्दल असुरक्षित असतात.

‘एचआर’ची जबाबदारी

हायब्रीड वर्क मॉड्यूलसाठी, ‘एचआर’ची जबाबदारी थोडी वाढते. संभाषण कौशल्यात पारंगत असणारा ‘एचआर’ नियुक्त करणे आवश्यक आहे. कर्मचारी बाहेरून काम करतात तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही. हे सर्व सुरळीत चालवण्यासाठी एचआर सर्वोत्तम पर्याय आहे.

संतुलित आणि यशस्वी हायब्रीड वर्क मॉड्यूलचे नेतृत्व

हायब्रीड वर्क मॉड्यूलचे यश ऑनलाइन आणि प्रत्यक्षात काम करणे या पद्धतींचा समतोल साधण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. हायब्रीड वर्क मॉड्यूलचे अनेक फायदे आहेत, परंतु ते अमलात आणणे सोपे नाही. महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना या पद्धतीशी जुळवून घेता आले पाहिजे.

विचारात घेतले जाणारे घटक

कर्मचाऱ्यांच्या गरजा समजून घ्या.

प्रणालीमध्ये किती लवचिकता ठेवायची हे निश्चित करा.

कर्मचाऱ्यांचे त्यांच्या वेळेवर नियंत्रण असल्याची खात्री करा.

ऑनलाइन समुदाय तयार करा, नवीन तंत्रज्ञान अवगत करा.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप्लिकेशन्स वापरा.

हायब्रीड वर्क मॉड्यूल्ससाठी कंपन्यांची स्पष्ट उद्दिष्टे असावीत.

हे मॉड्यूल कसे नियोजित करावे, कसे चालवावे आणि त्यांचे मूल्यांकन कसे करावे याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखावीत.

प्रत्येक टीमच्या सदस्यासाठी त्यांच्या कामाच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत.

सर्व कर्मचाऱ्यांना स्टाफला त्यांच्या कल्पनांचे योगदान देऊ शकणारे धोरण असावे.

आपण नव्या पद्धतींशी जुळवून घेणे गरजेचे आहे. यामध्ये हायब्रीड वर्क सारख्या योजनेचा प्रयोग महत्त्वाची किंबहुना पहिलीच पायरी आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT