Aditya L1 Selfie eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Selfie : 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! पाहा व्हिडिओ

ISRO Sun Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे.

Sudesh

'आदित्य एल-1' हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये आदित्य उपग्रहाने काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. आदित्य उपग्रहावरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फीमध्ये दिसत आहेत. 4 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला होता, असंही यात सांगितलं आहे.

आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. 2 सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल.

सध्या आदित्य उपग्रह हा पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत आहे. 18 सप्टेंबर पर्यंत तो पृथ्वीभोवती फेरी मारेल. यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून तो एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एल-1 हा अंतराळातील असा पॉइंट आहे, जिथे पृथ्वी किंवा सूर्याचं गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू स्थिर राहते. यामुळेच या पॉइंटची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सीजेपी नेते कपिल सिब्बल यांच्या भेटीला

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT